12/03/2017, बौद्धिक प्रशिक्षण शिबीर, अकोला.


दि.12/03/2017 रविवार रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत बुद्ध विहार भीमनगर, अकोला येथे प्रबोधनपर तसेच प्रशिक्षणात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सर्वप्रथम भीम नगरातून समता सैनिक दलाच्या वतीने रॅली काढण्यात आली. समाजाला त्याद्वारे आवाहन करण्यात आले. नंतर विहारात कार्यक्रम घेण्यात आला ज्यात समता सैनिक दलाचे कार्यकर्ते आयु.बोध गणसिह, अरिय बौद्ध, रितेश अंभोरे, प्रशिक आनंद इत्यादी मुंबई, पुणे, नागपूर या ठिकाणाहून आलेल्या कार्यकर्त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

सद्यस्थितीत समाजाची दशा आणि दिशा या विषयावर प्रकाश टाकण्यात आला. बाबासाहेबांनी जन्मास घातलेल्या संघटना आणि त्या संघटनांच्या संविधानाची अमंलबजावणी आजघडीला उध्वस्त झालेल्या समाजाला किती अगत्याची आहे याची जाणीव करून देण्यात आली. आपल्या समाजाचा सळसळता गौरवशाली इतिहास उपस्थितांना विशेष प्रेरणादायी होता ज्यात बाबासाहेबांनी जन्मास घातलेल्या रिपब्लिकन पार्टी च्या तत्वज्ञानाची बीजे कशी रोवलेली आहेत हे प्रशिक आनंद यांनी उत्तमरीत्या विशद केले आणि सोबतच आपली नेमकी चळवळ कोणती यावरही प्रकाश टाकला. याप्रसंगी उपस्थित कार्यक्रमात तरुणांनी आणि महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. 120 पेक्षा हि अधिक समाजबांधव उपस्थित होते त्यापैकी 35 तरुणांनी स्वयंप्रेरणेने समता सैनिक दलात रीतसर सदस्य होऊन रिपब्लिकन चळवळीच्या पुनर्बांधणीसाठी कटीबद्द झाल्याबद्दल अकोलावासीयांकडून अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आयु. रितेश अंभोरे, संग्राम सिरसाट, कु.सपना उप्परवट यांनी विशेष श्रम घेतले त्याबद्दल त्यांचे आभार तसेच बुद्ध विहार कमिटीच्या सर्व कार्यकर्त्यांचेही मनपूर्वक आभार.

द्वारा:
समता सैनिक दल, शाखा अकोला

HQ दिक्षाभुमी नागपुर
www.ssdindia.org

(संविधानिक रिपब्लिकन चळवळीच्या पुनर्बांधणी साठी कटिबद्ध) 12 Mar 2017 akola 1
12 Mar 2017 akola 3
12 Mar 2017 akola 2

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *