समता सैनिक दलाद्वारे ‘रिपब्लिकन चळवळ जनजागृती कार्यक्रम’ संपन्न


🏵 समता सैनिक दलाद्वारे ‘रिपब्लिकन चळवळ जनजागृती कार्यक्रम’ संपन्न 🏵

दि. २४ फेब्रुवारी २०१९, रविवार रोजी, दुपारी ३ वाजता नालंदा बौद्ध विहार, नेरी, उर्जानगर परिक्षेत्र, चंद्रपूर’ येथे ‘रिपब्लिकन चळवळ जनजागृती कार्यक्रमाचे’ आयोजन करण्यात आले. समता सैनिक दल, शाखा दुर्गापूर, जिल्हा चंद्रपूर येथील पदाधिकाऱ्यांच्या पुढाकारातून घेण्यात आलेल्या सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयु. शार्दूल गणवीर यांनी केले तर आयु. प्रशिक आनंद यांना मार्गदर्शन करण्यास पाचारण करण्यात आले. सदर कार्यक्रमात त्यांनी आजमितीस देशापुढे उद्भवलेली संकटे आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी एकमेव सांघिक उपाय म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जन्मास घालून दिलेल्या रिपब्लिकन चळवळीच्या तिन्ही संघटना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया-समता सैनिक दल व भारतीय बौद्ध महासभा, यांची त्यांच्या संविधानासह आजमितीस पुनर्बांधणी करण्याची आत्यंतिक गरज विशद केली. रिपब्लिकन पक्षाची आघाडीची फौज असणारी संघटना, समता सैनिक दल हिची सशक्त बांधणी करण्यासाठी व ‘गाव तिथे शाखा व घर तिथे सैनिक’ याची अंमलबजावणी करण्यासाठी अधिकाधिक समाजबांधवांपर्यंत पोहोचता यावे म्हणून सदर प्रसंगी सदस्यता नोंदणी अभियान राबवून, आंबेडकरी अनुयायांना, विशेषतः तरुणांना बाबासाहेबांच्या आदेशाची जाणीव करून देऊन, त्यांना समता सैनिक दलाचे बौद्धिक लढवय्ये सैनिक होण्याचे आवाहनही याप्रसंगी करण्यात आले. तरुण वर्गाने, महिला-पुरुषांनी यांस उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला व सदस्य होऊन पुढील कार्यक्रमांच्या आयोजनाची जबाबदारी स्वीकारली. सदर कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी आयु. संदीप देठेकर, आयु. शार्दूल गणवीर आणि इतरही कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

द्वारा : समता सैनिक दल,
शहर शाखा चंद्रपूर, जिल्हा चंद्रपूर
(संलग्न-HQ, दीक्षाभूमी नागपूर)
www.ssdindia.org

(रिपब्लिकन पार्टीच्या घटनात्मक पुनर्बांधणीसाठी कटिबद्ध)

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *