The gathering was held for to built Republican Party :15 Aug 2019


💥 रिपब्लिकन पक्षबांधणीसाठी सभा संपन्न 💥

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जन्मास घालून दिलेल्या रिपब्लिकन चळवळीच्या पुनर्बांधणीसाठी प्राणपणाने कार्यरत असलेल्या समता सैनिक दल, शाखा दुर्गापुरच्या कार्यकर्त्यांची गुरुवार, दि. १५/०८/२०१९ रोजी सायंकाळी ८ वाजता पंचशील बौद्ध विहार वार्ड क्र ०४ दुर्गापूर येथे सभा आयोजित केली. सदर सभेत ‘रिपब्लिकन पक्षाच्या बांधणीबाबत तांत्रिक अडचणीची सोडवणूक करून पक्ष लोकाभिमुख करू इच्छिणाऱ्या प्रबुद्ध रिपब्लिकन पक्षाशी संलग्नित होऊन पक्षबांधणीच्या कार्यास गतिमान करण्याचे एकमताने ठरविण्यात आले व सोबतच कार्यकर्त्यांनी पक्षाचे सभासदत्वही स्वीकारले. लवकरच चंद्रपूर जिल्ह्यात रिपब्लिकन पक्षबांधणीसाठी सदस्यता-अभियान राबविण्याच्या कार्यात समता सैनिक दलाने पुढाकार घेण्याचे ठरविले आहे.

द्वारा : समता सैनिक दल,
शाखा -दुर्गापूर, जिल्हा-चंद्रपूर
www.ssdindia.org

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *