समता सैनिक दलाद्वारे ‘सदस्यता नोंदणी कार्यक्रम संपन्न’ ३१ जाने २०१९


🏵 समता सैनिक दलाद्वारे ‘सदस्यता नोंदणी कार्यक्रम’ संपन्न 🏵

दि. ३१ जानेवारी २०१९ रोजी, चिमूर तालुक्यातील संघरामगिरी येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही ‘दोन दिवसीय धम्म समारंभ’ (३० व ३१ जानेवारी) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास महाराष्ट्रातील विविध शहरांतून-गावांतून हजारोंच्या संख्येने बौद्ध अनुयायी आपला सहभाग नोंदवित असतात. याचेच औचित्य साधून समता सैनिक दल, शाखा काटवल (तुकूम) त. भद्रावती व चंद्रपूर शहर-शाखेच्या पदाधिकाऱ्यांच्या पुढाकारातून सदर कार्यक्रम प्रसंगी बौद्ध अनुयायांना ‘पिण्याचे शुद्ध पाणी वाटप’ करण्याचा कार्यक्रम हाती घेतला व तद्वतच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जन्मास घालून दिलेल्या रिपब्लिकन चळवळीच्या तिन्ही संघटना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया-समता सैनिक दल व भारतीय बौद्ध महासभा यांची त्यांच्या संविधानासह माहितीपत्रके वाटून इत्यंभूत माहिती देण्यात आली.

रिपब्लिकन पक्षाची आघाडीची फौज असणारी संघटना, समता सैनिक दल हिची सशक्त बांधणी करण्यासाठी व ‘गाव तिथे शाखा व घर तिथे सैनिक’ याची अंमलबजावणी करण्यासाठी अधिकाधिक समाजबांधवांपर्यंत पोहोचता यावे म्हणून सदर प्रसंगी सदस्यता नोंदणी अभियान राबवून, आंबेडकरी अनुयायांना, विशेषतः तरुणांना बाबासाहेबांच्या आदेशाची जाणीव करून देऊन, त्यांना समता सैनिक दलाचे बौद्धिक लढवय्ये सैनिक होण्याचे आवाहन करण्यात आले. तरुण वर्गाने, महिला-पुरुषांनी यांस उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला व सदस्य होऊन गावपातळीवर पुढील कार्यक्रमांच्या आयोजनाची जबाबदारी स्वीकारली. सदर कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी आयु. अजय सोरदे, भीमराव सांगोडे, प्रफुल्ल टेम्भुरने, आकाश टेम्भुरने, संदीप देठेकर, आयु. निकेश टेम्भुरने, शार्दूल गणवीर, प्रशिक आनंद इत्यादी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. बाबासाहेबांच्या रिपब्लिकन चळवळीची धुरा आपल्या खांद्यावर घेण्यासाठी सज्ज झालेल्या नवसदस्यांचे हार्दिक अभिनंदन !

द्वारा : समता सैनिक दल,
शहर शाखा चंद्रपूर, जिल्हा चंद्रपूर
(संलग्न-HQ, दीक्षाभूमी नागपूर)
www.ssdindia.org

(रिपब्लिकन पार्टीच्या घटनात्मक पुनर्बांधणीसाठी कटिबद्ध)

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *