31 Jan 2016 नागपूर येथील विविध भागातील बौद्ध विहारात आयोजित चर्चात्मक बैठकसभेत विशेष सहभाग


## समता सैनिक दलाचा नागपूर  येथील विविध भागातील बौद्ध विहारात आयोजित चर्चात्मक बैठकसभेत विशेष सहभाग. ##

रविवार दि. 31 जानेवारी 2016  रोजी, नागपूर शहरातील धम्मबोधी विहार (भिमोदय मंडळ) विश्वकर्मा नगर येथे दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत आणि क्रियाशील बौद्ध विहार, जाटतरोडी येथे दुपारी 3 ते 5 वाजेपर्यंत समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांनी, तेथील विहाराच्या आयोजकांनी आयोजित केलेल्या सभेत आपली रिपब्लिकन चळवळ आणि त्या चळवळीच्या अराजकीय मुळा भक्कम करण्यासाठी असलेल्या संघटनेचा ‘समता सैनिक दल’ हा एक अविभाज्य भाग कसा अधिकाधिक मजबूत करता येईल या अनुषंगाने विचार मांडलेत.

त्यात त्यांनी आंबेडकरी चळवळ राबविण्यासाठी बाबासाहेबांनी समाजास दिलेल्या तीन संघटना ( समता सैनिक दल, रिपब्लिकन पार्टी, दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ) आणि त्यांचे तीन संविधान याविषयी माहिती दिली. शिवाय त्या संघटनांच्या संविधानाच्या अंमलबजावणीसाठी आमची बांधिलकी असणे अतिशय गरजेचे आहे हेही स्पष्ट केले. उपस्थित तरुणांनी त्यावर आपली सकारात्मक प्रतिसाद देऊन मते मांडलीत आणि समता सैनिक दलाची दणकट बांधणी केल्याशिवाय समाजाला तरणोपाय नाही यावर शिक्कामोर्तब केले. आयोजकांनी घेतलेल्या अथक परिश्रमाबद्दल समता सैनिक दल आभारी आहे.

द्वारा प्रसारित,

समता सैनिक दल
HQ, दीक्षाभूमी, नागपूर.
www.ssdindia.org

(रिपब्लिकन पार्टी च्या पुनर्बांधणी साठी कटिबद्ध)31 jan 2016 3 31 jan 2016 4

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *