” समता सैनिक दल ”
रविवार दि. 14 फेब्रुवारी 2016, रोजी दीक्षाभूमी , नागपूर येथे, डॉ. बाबासाहेबांच्या साहित्यावर चर्चात्मक अध्ययनाचा भाग म्हणून खालील विषयावर अभ्यासात्मक चिंतन करण्यात आले.
विषय : क्रांति कशाला म्हणतात? (खंड क्रमांक 20)
कम्युनिस्टांच्या चळवळीवर लिहिलेल्या अग्रलेखाच्या विषयानुरोधाने ‘बहिष्कृत भारत’ या आपल्या वृत्तपत्रातील लेख हा त्यांच्या क्रांतिकारक चळवळी संबंधाने होता. त्यात बाबासाहेब म्हणतात की, ” कम्युनिस्टांचे ध्येय आत्यंतिक असले तरी ते अयोग्य आहे असे आम्ही म्हटले नव्हते. कम्युनिझमचे ध्येय जसे राजकीय स्वरूपाचे आहे, आणि सामाजिक बाबतीत लोकमतांमध्ये प्रथम, जी क्रांति व्हावयास पाहिजे ती झालेली नाही. त्याचप्रमाणे कम्युनिझमचे आर्थिक व राजकीय ध्येय समजण्याची पात्रता समाजातील बहुसंख्य लोकांच्या अंगी अद्यापि आलेली नाही. सोशियालीझम व कम्युनिझम यांच्या ध्येयांमध्ये म्हणण्यासारखा काहीच फरक नाही. कम्युनिझम (रशियातील बोल्शेविक चळवळ) याला सध्या विशिष्ट अर्थ प्राप्त झालेला आहे आणि सोशियालीझमचे अंतिम साध्य ज्यांना मान्य आहे असे लोकही कम्युनिस्टांच्या चळवळीविरुद्ध आहेत याचे कारण रशियन कम्युनिस्टांचे मार्ग व धोरण ही झटपट क्रांतीच्या उद्देशाने योजिलेली असून उत्क्रांतीच्या मार्गाच्या आड येणारी आहेत, हे होय. क्रांति घडवून आणण्याचा प्रयत्न करतांना सत्यासत्य, न्यायान्याय काही पाहावयाचा नाही, अत्याचार निषिद्ध समजावयाचे नाहीत आणि वेळ पडल्यास रक्तपात करून सोव्हिएट पद्धतीवर नवीन राज्य स्थापावयाचे हा जो क्रांतिवादी कम्युनिस्टांचा मार्ग आहे तो आम्हाला पसंत नाही, तो देशाच्या प्रगतीचा आड येणारा आहे.” पुढे बाबासाहेब असे म्हणतात की, आमच्या चळवळीचे मार्ग मात्र झटपट क्रांतीचे व अत्याचारप्रवर्तक नाहीत. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व व न्याय यावर आधारित समाजाची पुनर्रचना करणे हिच आमची क्रांतीमुल्ये होत.
सामूहिक चर्चात्मक, अध्ययनाची वेळ, दर रविवारी सकाळी 9 ते 11,
स्थळ ..दीक्षाभूमी, नागपूर. www.ssdindia.org
शिकवा, चेतवा, आणि संघटित करा !
समता सैनिक दल,
HQ, दीक्षाभूमी, नागपूर.
(रिपब्लिकन पार्टीच्या पुनर्बांधणीसाठी कटिबध्द.)