शिकवा!📝 चेतवा!💡 संघटित करा! 👫👪👬👭
मित्रांनो
सप्रेम जयभिम दि. १४ फेब्रूवारी २०१६ रोजी भिमनगर संबोधी बूध्द विहारामधे समता सैनिक दलामार्फत बौध्दिक प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले.
💡सामाजिक संघटन म्हणजे काय ❓
💡सामाजिक संघटनेची गरज का आहे ❓
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लेकरांनसाठी समाजाची पुण्रनिर्मिती करण्यासाठी कोणते सामाजिक संघटन दिले आहे का ❓
💡सामाजिक संघटनेचे ध्येय ऊद्दिष्ठे काय असावित ❓
वरिल सर्व प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेल्या मान्यवरांनी आपली मते नोंदवली. समता सैनिक दल हेच सामाजिक संघटन सर्व क्षेत्रामधे भारतियांच्या जिवनात बदल घडवून आणू शकते हे ऐतिहासिक सत्य आहे. याची सर्वांना जाणही आली आणि शत्रूंच्या ऊरात धडकी भरवणार्या जाज्वल्य ईतिहासाची पूनरावृत्ती करायला सर्व तयार ही झाले.
समता सैनिक दला विषयी भारतात अजुनही जागृती नाही किंवा अशा प्रकारचे संघटन आहे हेही खूप लोकांना माहित नाही. काही लोकांना समता सैनिक दल म्हणजे वृध्दांचे संघटन जे काही विशिष्ठ दिवशी दिसते तेच आहे कि काय असे वाटते.
👉मग समता सैनिक दल नेमकं काय ? कूठे ? अन कस असायला हवं ? याविषयी थोडी चौकशी केली असता माहिती मिळवली असता असे लक्षात येते कि, 💡 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या संघटनेची घटना लिहली आहे. मग ति घटना कूठे आहे हे शोधले असता महाराष्ट्र शासनाने प्रकाषित केलेले ☀ डॉ.बाबासाहेबांचे लेखण व भाषणे यांच्या खंडामधे ति सापडते. खंड १७ भाग ३ पान क्र. ५६६ वर समता सैनिक दलाची घटना आपल्याला दिसून येते.
☀प्रशिक्षणाच्या पहिल्या सत्रामधे समता सैनिक दलाची विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहलेल्या घटनेचे सामूहिक चर्चात्मक अध्ययन करण्यात आले. ज्यामधून सर्वांना समता सैनिक दलाची भूमिका सर्वांना स्पष्ठ झाली. ज्यांची काही प्रश्न आले त्या घटनेवर आधारित त्यांचे निराकरण करण्यात आले.
☀प्रशिक्षणाच्या दूसर्या सत्रामधे समता सैनिक दला मधे निडर व त्याग भावनेने कार्य करण्यास ईच्छूक व्यक्तिंना शामिल करण्यात आले. भारतियांच्या सर्वांगिण विकासासाठी जे बूध्द तत्वज्ञान डॉ. बाबासाहेब आंबेडकारांनी भारतियांना दिले त्याचा प्रचार अन प्रसार झाल्याशिवाय विकास शक्य नाही. याचा विचार करून समता सैनिक दलाने ते 💡बूध्द तत्वज्ञान सर्व जनते पर्यंत पोहचावे म्हणून त्या तत़्ज्ञानावर परिक्षा घेण्याचे ठरवले. त्यानूसार वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेल्या सैनिकांनी आपली जबाबदारी समजून त्याचा प्रचार व प्रसारार्थ परिक्षा प्रतिनिधी होण्याचे ठरवले.
तसेच नविन सैनिक होण्यास इच्छुक होते ,त्यांची नोंदणी करून त्यांना समता सैनिक दल मध्ये समाविष्ठ करण्यात आले.
समता सैनिक दल.
(www.ssdindia.org)
शाखा- मुंबई.
08655582188.
9823557660.
9324127909.
09004149111.