रिपब्लिकन चळवळ : ‘जनजागृती अभियान’ कार्यक्रम संपन्न 03 Dec 2018


घर घर रिपब्लिकन, हर घर रिपब्लिकन

🏵 ‘रिपब्लिकन चळवळ : जनजागृती अभियान’ कार्यक्रम संपन्न 🏵

सोमवार, दिनांक ३/१२/२०१८ रोजी रात्री ७ ते ९ वाजता चंद्रपूर जिल्ह्यातील, दुर्गापूर परिसरात समता सैनिक दलाच्या वतीने आंबेडकरी अनुयायांत ‘रिपब्लिकन चळवळ – जनजागृती अभियाना’ अंतर्गत सभेचे  आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयु. शार्दूल गणवीर यांनी केले तर उपस्थितांना आयु. प्रशिक आनंद यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी बाबासाहेबांनी समाजाच्या उद्धारासाठी दिलेल्या रिपब्लिकन चळवळीच्या तीन मूलगामी संघटनांवर (RPI, SSD, BSI) मार्गदर्शन करण्यात आले. समाजाने आता रिपब्लिकन चळवळ पूर्ववत सशक्त करून समाज संघटित करण्याकडे वाटचाल केली पाहिजे असे त्यात ठरविण्यात आले. तद्वतच समता सैनिक दलाची शाखा बांधणी करण्याच्या दिशेने पुरुष वर्गाने सकारात्मकता दर्शविली व सदस्यता स्वीकारून रिपब्लिकन चळवळीने पुनर्भरारी घेण्यासाठी समता सैनिक दलाचे अधिकाधिक सामर्थ्य निर्माण करण्याचा त्यांनी प्रण केला. लवकरच शाखेची (कार्यकारिणी) स्थापना करण्याचे ठरविण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आयु. शुभम ताडे यांनी केले.
 हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता समता सैनिक दल, चंद्रपूर येथील पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला. सुसंवाद साधून जनजागृती कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल उपस्थित सर्व समाज बांधवांचे आभार.
जय भारत !

द्वारा : समता सैनिक दल,
शाखा- दुर्गापूर परिसर, जिल्हा चंद्रपूर
(HQ, दीक्षाभूमी नागपूर यांचेशी संलग्नित)
www.ssdindia.org

(रिपब्लिकन चळवळीच्या घटनात्मक पुनर्बांधणीसाठी कटिबद्ध)

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *