रिपब्लिकन जनजागृतीचा बौद्धिक प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न, चंद्रपूर १५ ऑक्टो. २०१७


💥 चंद्रपूर जिल्ह्यात समता सैनिक दलाच्या वतीने रिपब्लिकन जनजागृतीचा बौद्धिक प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न💥

रविवार दिनांक 15/10/2017 रोजी सम्राट अशोक हायस्कुल, चिचपल्ली, जिल्हा चंद्रपूर येथे समता सैनिक दलाच्या वतीने सुरू असलेल्या तीन दिवशीय निवासी प्रशिक्षण कार्यशाळेत आंबेडकरी बौद्ध अनुयायांत संघटनात्मक जनजागृती अभियानाचा भाग म्हणून बाबासाहेबांनी रिपब्लिकन पार्टी साठी लिहिलेल्या तत्त्वज्ञानावर बौद्धिक प्रशिक्षणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमात नागपूरहून आलेले आयु. प्रशिक आनंद यांनी संबंधित विषयावर आपला गौरवशाली इतिहास आणि सार्वजनिक जीवनात तथागत बुद्धाने सांगितलेल्या वैज्ञानिक सिद्धांताना प्रस्थपित करण्यासाठी करावा लागणारा संघर्ष आणि त्यानंतर न्यायाद्वारे समाज जीवनात निर्माण होऊ शकणारे शांतीमय जीवन हे विशद करतांना रिपब्लिकन पार्टी च्या सिद्धांतात बुद्धधम्माची पाळेमुळे कशी आहेत हे पटवून दिले. तेव्हा रिपब्लिकन पार्टी ही बाबासाहेबांनी समस्त आंबेडकरी समाज बांधवांना दिलेली अमूल्य देण होय याची प्रचिती आणून देऊन सद्यपरिस्थित ती घराणेशाहीच्या विळख्यात सापडलेली असल्याने त्यातून तिची मुक्तता करून घटनात्मक लोकशाहीच्या आधारावर तिची पुनर्बांधणी करण्यासाठी समाज बांधवांना आवाहन केले.  भारताला, प्रबुद्ध भारत करण्यासाठी याची नितांत आवश्यकता प्रतिपादित केली तसेच समता सैनिक दल व भारतीय बौद्ध महासभा या संघटनांचा महत्वपुर्व अविभाज्य सहभाग लक्षात घेऊन चळवळीची पुढील वाटचाल करण्याविषयी विचार मांडलेत.

 
 हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता समता सैनिक दलाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने परिश्रम घेणारे आयोजक प्रामुख्याने आयु. अशोक टेम्भरे सर, फुलझेले सर, भसारकर सर आणि इतरही गणमान्य कार्यकर्ते यांचे विशेष आभार. कार्यक्रमात महिलांनी, व विद्यार्थ्यांनी घेतलेल्या लक्षणीय सहभागाबद्दल व कार्यक्रमास यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल उपस्थित सर्व समाज बांधवांचे आभार.
जय भीम   

द्वारा : समता सैनिक दल, चंद्रपूर

(रिपब्लिकन पार्टीच्या घटनात्मक पुनर्बांधणीसाठी कटिबद्ध)

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *