प्रशिक्षण शिबीर 27 नोव्हेंबर 2016, मुंबई


शिकवा ❗चेतवा❗आणि   संघटित करा‼

मित्रांनो,
सप्रेम जयभीम, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी सेवा देण्यासाठी येत असेलेल्या स्वयंसेवी कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण शिबीर 27 नोव्हेंबर 2016 साली, उलनमिल स्कुल, दादर येथे यशस्वीरित्या संपन्न झाले. महाराष्ट्रभरातील वेगवेगळ्या भागातून आलेल्या तसेच SSD कडे नोंदणीकृत स्वयंसेवी कार्यकर्त्यांनी प्रशिक्षणसाठी हजेरी लावली. प्राेजेक्टरच्या माध्यमाने, प्रात्यक्षिकद्वारे अनेक मान्यवर मंडळींनी सुरक्षेशी निगडीत विषयावर स्वयंसेवी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. SSD टीम मुंबई तर्फे मान्यवरांचे स्वागत पंचशिल शॉल, गुलाबपुष्प तसेच बुध्द आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ देऊन करण्यात आले.
स्वयंसेवी कार्यकर्त्यांच्या या प्रशिक्षणामधे दि बुध्दीस्ट सोसायटी ऑफ ईंडियाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष आयु. ऐड. बर्वे आणि मुंबई प्रदेश सचिव आयु. शिवराम कांबळे यांनी विशेष ऊपस्थिती गाजवली.

मार्गदर्शक आणि विषय

१) ऐ.पि.आय. आयु. आव्हाड सर ( सुरक्षा )
२) आयु. राजेंन्द्र लोखंडे सर ( BMC अधिकारी ) ( प्रोजेक्टर – आपत्ती मधे काय करावे )
३) डॉ. विकास कुर्णे सर ( रेड ईंडियन क्रॉस सोसायटी ) ( प्राथमोपचार )
४) प्रविण ब्रम्हदंडे सर ( BMC अधिकारी ) ( प्रात्यक्षिक – आपत्ती आल़्यास काय करावे )
५) ईंटरनैशल डिटेक्टीव्ह शशांक यादव सर ( फायरवर्क )
६) भरतकुमार सुधाकर फुणगे  ( प्रात्यक्षिक – फायरवर्क )

प्रशिक्षण शिबीर पुर्ण झाल्यानंतर समता सैनिक दल मुंबई टीमची सभा घेण्यात आली. प्रशिक्षणापुर्वि दुरवरून आलेल्या स्वयंसेवी कार्यकर्त्यांना रितसर १ वर्षासाठी SSD घटनेनुसार  सभासदत्व देण्यात आले. गाव तिथे शाखा आणि घर तिथे सैनिक या दलाच्या बाबासाहेबांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे चालण्याचे सर्व सैनिकांनी ठरवले. दलाच्या सभेमधे SSD च्या घटनेचे सामुहिक चर्चात्मक अध्ययन करण्यात आले. सैनिकांनी ऊपस्थित केलेल्या घटनेशी निगडीत असलेल्या प्रश्नावर ऊत्तरे देण्यात आली परंतू वेळेअभावी काही विषयांवर प्रश्नोत्तरे झाली नाहीत. आपण आपल्या विभागामधे दलाची अधिकृत सभा बोलवून चर्चासत्र आयोजित करू शकता त्यामधे अनुत्तरित असलेल्या विषयांवर चर्चा घडवून आणता येईल. SSD ची घटना घराघरात पोहचवण्यात येईल असेही या सभेमधे सर्वानुमते ठरवण्यात आले. SSD ची प्रतिज्ञा घेऊन सदर सभेचे कामकाज तहकूब करण्यात आले.

टीप :- सर्व सैनिकांना महापरिनिर्वाणदिनी सेवा देण्याबाबत पुढील सुचना सोशल मिडिया तसेच फोनवर संपर्क करुन देण्यात येईल.

सुचना:- जे स्वंयसेवी सदर प्रशिक्षण शिबीर मध्ये उपस्थित नव्हते त्याच्यासाठी दिनांक ४ डिसेंबर रोजी प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात येत आहे त्यासाठी सर्व स्वंयसेवकांनी👇🏼 खालील नंबर संपर्क करून नोंदणी करून घेणे हि नम्र विनंती🙏

समता सैनिक दल   संपर्क:+  📞8655582188 📞9324127909  Website : www.ssdindia.org

27-nov-2016-1 27-nov-2016-2 27-nov-2016-3 27-nov-2016-4

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *