Collective Study at HQ Deekashabhoomi, Nagpur 27 Dec 2015


~~  समता सैनिक दल   ~~ HQ, दीक्षाभूमी, नागपूर.  दिनाक- 27 डिसेंबर  2015.
‘नालंदा विद्यापीठ व् त्याचा इतिहास’ या विषयवार सामूहिक अध्ययन घेण्यात आले..( vol. 20 page no. 561)

नालंदा हे बिहार राज्यातील सुप्रसिद्ध बौद्ध अवशेषाचे एक स्थळ आहे. गंगा नदीच्या काठी पाटन्याच्या आग्नेयास 70 किलोमीटर व राजगीर च्या उत्तरेस 11.27 किलोमीटर वर बड़गांव नामक खेड्याच्या परिसरात वसलेले आहे..प्राचीन काळात नालंदाची नल, नालकग्राम,नालंदा वगैरे भिन्न नामांतरे आढळतात.
प्राचीन वाङ्मय पुराव्यानुसार नालंदाची प्राचीनता मौर्यकाळातील अशोका च्या सामर्ज्यापासून होती. या स्थळाची भरभराट ईसवीसनाच्या 5 ते 6 शतकापासुन पुढें आली. कनिंगह्यम यांनी ह्या स्थळाचा  शोध 1871 मधे लावला. पण उत्खनन 1916 पासून पुढें कित्येक वर्ष करण्यात आले. यात अनेक मंदिर, विहार, स्तूप, मुद्रा , ब्राँझ् च्या मूर्ति सापडल्या तसेच पाय-या असलेली उत्तुंग मंदिरे, मधे चौक् भोवताली व्हरंडा आणि अनेक खोल्या असलेले अनेक विहार आणि सभागृहे यावरून प्राचीन विद्यापिठीय जीवनाची कल्पना येते. या इमारितीचे स्तम्भ आणि भिंती कलात्मक चित्रांनी व् कोरीव कामाने सजविल्या होत्या. विद्याथ्र्यांचे जीवन कसे होते यावर प्रकाश टाकणारा पुरावा ही येथे मोठया प्रमाणात उपलब्ध झाला आहे.
नालंदा विहाराच्या खाजगी  व् श्रेणीच्या मुद्राहि बऱ्याच मिळाल्या आहेत.
अनेक स्तूपात बौद्ध मठ व् धार्मिक ग्रंथांचा मजकूर असलेल्या मृन्मुद्राहि हाती आल्या आहेत.
नालंदा विद्यापीठ प्राचीन भारतातील एक आदर्श विद्यापीठ होते. उत्खननात सापडलेल्या मुद्रेवर ‘ श्रीनालंदा महाविहार – आर्यभिक्षुसंघस्य ‘ असे लिहलेले आहे व् तिच्या दोन्ही बाजुवर सारनाथचे धर्मचक्र आहे.
नालंदा विद्यापीठाच्या सुमारे दीड किमी लांब व् सुमारे पाऊण किलोमीटर रुंद क्षेत्रात विद्यापीठाची भव्य इमारत , व् वसतिगृह होते. याशिवाय सुसज्ज ग्रंथलयाची रत्नसागर, रत्नोदय, व् रत्नरंजक अशा तीन सुन्दर इमारती  होत्या. या ग्रथलयाच्या विभागास  ‘धर्मगंज’ म्हणत.
निवासासाठी 4,000  व् अभ्यासासाठी 1,000  खोल्या होत्या. 8,500 विद्यार्थी  व् 1,500 शिक्षक होते. येथे राहाणाऱ्यांना निवास, भोजन, कपडालत्ता , व औषधोपचार व् शिक्षण विनामूल्य असे ..हा सर्व खर्च दान दिलेल्या 100 खेडयांच्या उत्तपनातून व इतर देणग्यातुन  चाले..
नालंदा विद्यापीठाचा अभ्यासक्रम प्रगत ,उदार, आणि बहुव्यापक होता. त्यात सांप्रदायिकतेत भिन्न संप्रदाय, जैन धर्म, ब्राम्हणी धर्म व् इतर धर्म त्याचप्रमाने योग, व्याकरण, साहित्य, तर्कशास्त्र, शब्दविद्या, चिकित्साविद्या, गणित, चित्रकला, शिल्पशास्त्र, दंडनीती , वेदविद्या इत्यादि विषय शिकविन्याची व्यवस्था होती. “सत्याच्या शोधाची पहिली अट स्वातंत्रय आहे” असे मानण्यात येई. विद्यापीठच्या कीर्तिमुळे देशातील कानाकोपर्यातून  चीन ,कोरिया, तिबेट इत्यादी पर्देशातून येथे विद्यार्थी येत ..द्वारपण्डित (Intellectual Gate keeper) घेत असलेली प्रवेशपरीक्षा अत्यंत कड़क असे, प्रवेश घेवू इच्छिणा-या विद्यार्थयापैकी शेकड़ा 20 ते 30 % विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळे.
न्यायशास्त्र ही या विद्यापीठ ची मोठी देंणगी आहे..
चारित्र संपन्न , व् बुद्धिमान शिक्षक ,अभ्यासू  व् होतकरु विद्यार्थि ,कुशल प्रशाशन, राज्यकरत्यांचा सतत लाभलेला आश्रय यामुळे नालंदा विद्यापीठचि उत्तरोत्तर सतत आठ शतके भरभराट होत गेली.
भारतातील अध्ययन  -अद्यापनाच्या श्रेष्ठ परंपरेला सातत्य व् समृद्धि लाभवून देण्यात या विद्यापीठाचा फार मोठा वाटा आहे. नालंदा विद्यापीठाची  आठवण म्हणून याच ठिकाणी बिहार सरकार च्या सहकार्याने 1951 साली नवनालंदा महाविहार नालंदा पाली प्रतिष्ठान स्थापन करण्यात आले.

Timing for collective study:
Every sunday 9.00 am to 11.00 am.
@ Deekshabhumi , Nagpur.

For more information please visit
www.ssdindia.org

Educate,  Agitate and Organize.

SAMTA  SAINIK  DAL,
HQ, Deekshabhoomi,NAGPUR.

( Committed to the revival of constitutional  Republican Party)27 Dec 2015 Deekshabhoomi 1 27 Dec 2015 Deekshabhoomi 2

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *