:: समता सैनिक दलाचा सहभाग:: अनाथपिंडक बौद्ध विहार, काटोल रोड , नागपूर मध्ये भीमा कोरेगाव विजय दिवस व सावित्रीमाई जयंती उत्साहात साजरी.
जय भिम …
दि. ०३ जानेवारी २०१६ रोजी दुपारी ३.०० वाजता अनाथपिंडक बौद्ध विहार महिला मंडळाच्या वतीने सावित्रीमाई फुले जयंती व भीमा कोरेगाव विजय दिवस साजरा करण्यात आला. भीमा कोरेगाव चा जाज्वल्य ईतिहास आयु. प्रशिक आनंद, समता सैनिक दल, नागपूर यांनी मांडला. त्या वेळी उपस्थितांचे डोळे बरेचदा भरून आलेत व हा विषय तेथील लोकांनी गांभीर्याने ऐकून घेतला. सर्वांशी संवाद साधून आपली नेमकी चळवळ कोणती, त्याची उभारणी आपणास कशी करता येईल ,काय आम्ही समाजाचे घटक म्हणून ती आमची जबाबदारी पाडण्यास पुढाकार घेणार आहोत कि नाही ? आमच्या पूर्वजांनी जो इतिहास घडविला तसाच क्रांतिकारी इतिहास आमच्या वर्तमान पिढीने आमच्या भविष्यातील पिढ्यांसाठी घडवून क्रांतीचा वारसा पुढे देणार आहोत कि नाही ? इत्यादी विषयांकडे लक्ष वेधून घेतले. या प्रसंगी आयुष्यमती अल्का चौकीकर, आयुष्यमती मृणालीनी दहीवेले, अध्यक्षा आयुष्यमती उके मॅडम तसेच दलातील सैनिक व इतर समाजबांधव उपस्थित होते. महिलांची उपस्थिती विशेष उल्लेखनीय होती.
शिकवा, चेतवा आणि संघटीत करा !
समता सैनिक दल, HQ दीक्षाभूमी, नागपूर
( Committed to the revival of the great constitutional Republican Party )