दि.08/01/2016 रविवार रोजी सायंकाळी सद्धम्म उपासक संघ बजेरिया चौक संत्रा मार्केट रोड, नागपूर येथे प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यात भीमा कोरेगाव शौर्य दिन आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले जयंती संयुक्त रूपाने साजरी करण्याच्या उद्देशाने विचार मांडण्यासाठी समता सैनिक दलाचे कार्यकर्ते आयु.प्रशिक आनंद तसेच तसेच राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या कार्यकर्त्या आयुष्यमती वंदनाताई वनकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. भीमा कोरेगावच्या रणसंगरात गाजविलेल्या शूर महार सैनिकांचा क्रांतीचा सळसळता इतिहास उपस्थितांना विशेष प्रेरणादायी होता ज्यात बाबासाहेबांनी जन्मास घातलेल्या रिपब्लिकन पार्टी च्या तत्वज्ञानाची बीजे कशी रोवलेली आहेत हे प्रशिक आनंद यांनी उत्तमरीत्या विशद केले आणि सोबतच आपली नेमकी चळवळ कोणती यावरही प्रकाश टाकला. याप्रसंगी उपस्थित तरुणांनी स्वयंप्रेरणेने समता सैनिक दलात सामील होऊन रिपब्लिकन चळवळीच्या पुनर्बांधणी साठी कटीबद्द होण्याचे जाहीर केले आणि त्याच अनुषंगाने हा कार्यक्रम आयोजित केला. कार्यक्रमात तरुणांनी आणि महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आयु. सी.पी. उराडे यांनी विशेष श्रम घेतले त्याबद्दल त्यांचे आभार तसेच सद्धम्म उपासक संघाच्या सर्व कार्यकर्त्यांचेही मनपूर्वक आभार.
द्वारा: समता सैनिक दल,
HQ, दीक्षाभूमी, नागपूर.
www.ssdindia.org
(रिपब्लिकन चळवळीच्या पुनर्बांधणी साठी कटिबद्ध)