२२ जाने. २०१७ आपणाजवळ जर मजबुत संगठन नसेल तर देशाच्या राजकारणात आपणाला कोणतेही स्थान असु शकत नाही


जयभिम मित्रांनो,

२२ जाने. २०१७ रोजी दीक्षाभूमी येथे बाबासाहेबांच्या साहित्याचे (DBAWS 18/3) सामुहिक वाचन करण्यात आले, त्यातील काही अंश खालीलप्रमाणे :

आपला सर्वांचा प्रयत्न हाच आहे की भारत बाबासाहेबांच्या स्वप्नातील प्रबुध्द राष्ट्र बनावे. त्यासाठी आम्हाला एक संगठन, एक विचार आणि एक मार्गदर्शक नेता असने जरुरी आहे. बाबासाहेब म्हणतात “आपणाजवळ मजबुत संगठन नसेल तर देशाच्या राजकारणात आपणाला कोणतेही स्थान असु शकत नाही. ‘अछुत’ लोक जर एकसंघ अशा एका जातीत संघटीत झाले तर आपण राजकारणात काही स्थान प्राप्त करु शकतो. आपले मजबुत व एकसंघ संघटन करण्यासाठी आपण दहा वर्षेपर्यंत थांबु नये. ही संघटना आतापासुनच बांधली पाहीजे; ही संघटना आजच आपण बांधली पाहीजे. होय. उद्याही नव्हे, परवाही नव्हे तर आजच ! जर या दहा वर्षाच्या कालावधीत आपण आपली संघटना दृढ आणी मजबुत पायावर उभी करुन कार्यरत केली नाही तर या दहा वर्षानंतर ‘ मनूस्मृती-राज ‘ स्विकारण्याचे दुर्दैव आपल्या नशिबी येईल. वस्तुतः अशी संघटना आधीच आपणाजवळ आहे. आपली फेडरेशन(SCF चे आता RPI) हीच आपली संघटना होय. आपणाला फक्त ती मजबुत करावयाची आहे. झाड आधिच लावण्यात आलेले आहे. आपणाला फक्त त्याला पाणि घालुन त्याची जोपासना करावयची आहे. निवडणुक आयुक्ताकडुन आपली फेडरेशन ही अखिल भारतीय संघटना असल्याचे मान्य करण्याथ आले आहे. आपणाला नविन घर बांधावयाचे नाही. घर पुर्विचेच आहे. आपणास जे काही करावयाचे आहे ते ईतकेच की ते सुव्यस्थित स्थितीत सांभाळावयाचे आहे. आत्तापासुनच आपण त्यासाठी जोमदार प्रयत्न केले नाही आणी जर समाधान मानुन राहिलो तर अशी वेळ येउन ठेपण्याची शक्यता आहे की बेघर होउन आपणास इकडे तिकडे भटकावे लागेल आणि सर्व प्रकारचा अपमान, अन्याय, अत्याचार सहन करावा लागेल व वेदकाळापासुन ज्याची आपण शिकार झालो होतो अशाप्रकारचे पंगुत्व आपणास येईल. “
आम्ही बाबासाहेबांनी दिलेल्या उपरोक्त धोक्याच्या इशार्‍याची अवहेलना केली. जर आता तरी बाबासाहेबांच्या या विचाराला अमलात आणुन बाबासाहेबांनी दिलेल्या केवळ तिन संघटना (SSD, TBSI & RPI) मजबुत केल्या तर हा येणारा संभावित धोका थोपवताच नाही तर परतवून लावता येईल व बौध्द धम्माची पताका संपुर्ण देशात फडकविण्यात यश येईल.

समता सैनिक दल

www.ssdindia.org

22 jan deekshabhoomi 1 22 jan deekshabhoomi 2

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *