डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानानुसार भारतीय समाजाला समतेची मूल्ये यांची जाणीव करून दिली आहे.त्यामुळेच प्रत्येकजण आपला स्वविकास साधत आहे. बाबासाहेबांनी आपणांस दिलेल्या मूळ संघटनांचे प्रचार-प्रसाराचे काम हाती घेऊन विविध ठिकाणी सर्व सैनिक मोठ्या जोमाने कामास लागले आहे. त्यानुसारच,काल रविवार,दिनांक:-22/10/2017 रोजी , सकाळी 11:00 वा. समता सैनिक दल, मुंबई जिल्हा संघटकांनी सै. सुचित सावंत यांच्या चिंचपोकळी, मुंबई या परिसरातील संघराज बुद्धविहार या ठिकाणी समता सैनिक दलाचे “बौद्धिक प्रशिक्षण शिबीर” आयोजित केले होते.
सदर शिबीरात 👮🏻आयु.सागर गरुड. आणि 👮🏻 डॉ. महेंद्र गांगुर्डे यांनी मार्गदर्शन केले.सैनिक डॉ.महेंद्र गांगुर्डे यांनी तथागत गौतम बुद्ध आणि त्यांचा वैज्ञानिक दृष्टीकोन या विषयावर मार्मिक विचार मांडून उचित असे मार्गदर्शन केले.
सैनिक सागर गरूड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना बाबासाहेबांच्या मूळ संघटनांचा उल्लेख करून त्यांनी समता सैनिक दल हे सामाजिक संघटन का उभारले हे SSD च्या स्थापनेपासून ते आताच्या सद्यस्थितीपर्यंतचे स्पष्टीकरण केले.दलाचे ध्येय-उद्दीष्टये, कृती कार्यक्रम आणि भविष्यातील दूरदृष्टीकोन लक्षात घेऊन घरातील वय वर्षे 18 पूर्ण झालेल्या सदस्याला जसा संविधानिक मतदानाचा अधिकार प्राप्त होतो, अगदी तसाच त्याला SSD या दलात सदस्य होण्यासाठी प्रोत्साहित करून सैनिक म्हणून अधिकार प्राप्त करून दिला पाहिजे व ही पालकांची एक नैतिक जबाबदारी आहे असे सांगून ठिकठिकाणी SSD चा प्रचार-प्रसार करण्याचे आवाहन केले. यानंतर उपस्थित नागरिकांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे सै. अभयादित्य बौद्ध, सै. विजय बनकर यांनी दिली.
कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन आणि सदस्य नोंदणीचे काम सै. सुचित सावंत, सै.अनिकेत कांबळे, सै. अतुल लाटकर,सै. अमोल जाधव आणि सै. सनी खरात यांनी केले.
या बौद्धिक प्रशिक्षण शिबीरामध्ये जवळपास 30 पेक्षा अधिक लोक उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित नागरिकांनी SSD चे कौतुक केले आणि दलात काम करण्याची इछा दर्शविली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सै. संदीप मर्चंडे यांनी सुरेख पद्धतीने केले.तसेच सै.अमोल जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले व दलाची प्रतिज्ञा घेण्यात आल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.