रिपब्लिकन चळवळीच्या पुणर्बांधणीसाठी कटिबध्द असलेल्या समता सैनिक दल मुंबई टिमच्या वतीने दि. 17/18 जून 2017 रोजी दोन दिवसीय यशस्वी निवासी रिपब्लिकन कैडर कँम्प ( बौध्दीक प्रशिक्षण ) चे आयोजन मुंबई येथील घाटकोपर आणि दादर या ठिकाणी करण्यात आले होते. मुंबई व ऊपनगर विभागातिल SSD चे सैनिक, भारतिय बौध्द महासभेचे धम्म प्रचारक, बौद्धजन पंचायत चे कार्यकर्ते, व अकोला-मलकापुर-भूसावळ-कोकण येथून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते या कैडर कँम्प मधे सहभागी झाले होते.
कैडर कँम्पचा पहिला दिवस
कैडर कँम्पची सुरूवात 17 जून रोजी सकाळी 11 वा. झाली. मुंबई व ऊपनगर यांच्या विविध विभागातील तसेच मुंबई बाहेरूनही निष्ठावंत आंबेडकरी अनुयायांनी सदर कैडर कँम्पमधे ऊत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
त्यानंतर मुंबई बाहेरून, दुरवरून रिपब्लिकन कैडर कँम्प अटेंड करण्यासाठी म्हणजेच बौध्दीक रित्या प्रशिक्षित होण्यासाठी ऊपस्थित असलेल्या सैनिकांचे, सैनिक-सनी खरात, सैनिक-प्रवीण पवार, सैनिक-संदिप सपकाळे, सैनिक-अनिकेत कांबळे यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. जगातील सर्वश्रेष्ठ अशा SSD च्या प्रतिज्ञेद्वारे बौद्धिक प्रशिक्षणास सुरूवात करण्यात आली!
रिपब्लिकन कैडर कँप विषयी थोडक्यात माहिती देऊन कार्यक्रमाचे प्रास्ताविक सैनिक-बोध गणसिंह यांनी केले. रिपब्लिकन कैडर कँम्पमधे पहिल्या दिवशी प्रशिक्षक आयु. मेघराज काटकर यांनी जगातील सर्वश्रेष्ठ अशा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची तत्वप्रणाली विविध ऊदाहरणे देऊन अत्यंत सोप्या पध्दतीने ऊपस्थितांना समजावून सांगितली. जेवणानंतर रिपब्लिकन चळवळी विषयक प्रश्नोत्तरे व संघटन बांधणी या या विषयावर प्रशिक्षक आयु. मेघराज काटकर आणि आयु. मिलिंद शामकूरे यांचे मार्गदर्शन झाले. सैनिक-संदिप सपकाळे यांनी कैडर कँपच्या पहिल्या दिवसाचे आभार व्यक्त करून सायं. 6 वा. समारोप घेतला.
कैडर कँम्पचा दुसरा दिवस
रविवार दि. 18:06:17 रोजी सकाळी ठीक 10:00 वा. कैडर कँम्पच्या दुसर्या दिवसाला सुरवात झाली. कॅम्प ची सुरुवात नेहमी प्रमाणे SSD ची जगातील सर्वश्रेष्ठ प्रतिज्ञा बोलून करण्यात आली. प्रशिक्षकांनी रिपब्लिकन चळविषयक ( SSD, RPI , RSF व TBSI ) थोडक्यात माहिती दिली. रिपब्लिकन चळवळीमधील रिपब्लिकन पार्टीचे 7 तत्वे, 7कार्यक्रम, 7 कसोट्या, 7 लोकशाहीच्या पुर्वअटी अश्याप्रकारे रिपब्लिकन आंदोलन समजवून सांगितले. चळवळ जमिनीवर जिवित असल्याची कसोटी कोणती? आणि शेवटी रिपब्लिक भारतातील रिपब्लिकन संस्कृती यावर विस्त्रुत मार्गदर्शन करण्यात आले. यानंतर प्रश्नोत्तरांचा तास झाला. तसेच मागील वर्षी SSD द्वारे राबवण्यात आलेली बुद्ध तत्वज्ञान स्पर्धा परिक्षेच्या स्पर्धंकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीसे देण्यात आली. या कार्यक्रमासाठी कोकणामध्यून प्रचारक आयु. रावजी यादव आले होते.
सैनिक-बोध गणसिंह व सैनिक अरियं बौध्द यांनी रिपब्लिकन कैडरच्या अनुषंगाने आपले मनोगत व्यक्त केले. शेवटी सैनिक-अतुल लाटकर यांनी सर्वांचे आभार व्यक्त करून रिपब्लिकन कैडर कँम्पचा समारोप घेतला.!!!
कार्यक्रमाच्या मोठ्या प्रतिसादामुळे कल्याण शहरामधील सैनिक-रंजना दाभाडे यांनी पुढच्या दिवशी, दि.19 जूनला कल्याण मधे समता सैनिक दलामधे सामील होण्यासाठी मिटींग आयोजित केली. ज्यामध्ये विविध संघटनेच्या महिला, पुरुष मिळुन ६० ते ८० कार्यकर्ते उपस्थित होते, मिटिंगचे फलित म्हणून सर्व उपस्थितीचे एकमत होऊन, सर्वजन गणवेशधारी सैनिक होण्याची प्रतिज्ञा घेऊन मिटींग बरखास्त करण्यात आली.
Drafted By :
बोध गणसिंह व अरियं बौद्ध
8999112156/ 8655582188
समता सैनिक दल
www.ssdindia.org