बौद्धीक प्रशिक्षण शिबीर आयोजक :- छत्रपती राजर्षी शाहू प्रतिष्ठाण वाघोली ,पुणे
सप्रेम जयभीम !
सर्व रिपब्लिकन भारतीयांना कळविण्यात आनंद वाटतो, कि समता सैनिक दल (SSD )आणि दि बुध्दीस्ट सोसायटी आॅफ इंडिया (TBSI) या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली सारनाथ बुध्दविहार, खराडी बस स्टॉप ,पुणे येथे बौध्द संस्कृती ,माध्यम ,बौध्द विचार , बौद्धांच्या विविध समस्या व उपाय, बौध्द समाजाची दिशा आणि डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारा रिपब्लिकन विचाराचा समाज निर्माण करण्यासाठी, धम्मचक्र गतीमान करण्यासाठी, सामाजिक अभिसरणाची प्रक्रिया पुढे नेण्यासाठी एक दिवसाचे चर्चात्मक बौद्धीक प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले. पुणे व वाघोली परिसरातील रिपब्लिकन भारतीय बांधवांनी या प्रशिक्षण वर्गात आपली उपस्थिती दाखवली. याप्रसंगी आयु. प्रशिक आनंद, अरिय बौद्ध, बोध गनसिंग यांनी मार्गदर्शन केले.