Daily Archives: 08/12/2018


अभिवादन रॅलीचे आयोजन, चंद्रपूर ०६ डिसेंबर २०१८

चंद्रपूर जिल्ह्यातील काटवल या गावी आंबेडकरी बौद्ध अनुयायांनी बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी रिपब्लिकन चळवळीच्या पुनर्बांधणीसाठी कटिबद्ध राहून समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांसमवेत अभिवादन रॅलीचे आयोजन केले. ‘घर-घर रिपब्लिकन, हर घर रिपब्लिकन’ ही प्रतिज्ञा प्रत्यक्षात उतरविण्यासाठी धडपडणाऱ्या समता सैनिक दलाच्या तमाम कार्यकर्त्यांच्या कार्यास आदरपूर्वक जयभीम.


रिपब्लिकन चळवळ : ‘जनजागृती अभियान’ कार्यक्रम संपन्न 03 Dec 2018

घर घर रिपब्लिकन, हर घर रिपब्लिकन 🏵 ‘रिपब्लिकन चळवळ : जनजागृती अभियान’ कार्यक्रम संपन्न 🏵 सोमवार, दिनांक ३/१२/२०१८ रोजी रात्री ७ ते ९ वाजता चंद्रपूर जिल्ह्यातील, दुर्गापूर परिसरात समता सैनिक दलाच्या वतीने आंबेडकरी अनुयायांत ‘रिपब्लिकन चळवळ – जनजागृती अभियाना’ अंतर्गत सभेचे  आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयु. शार्दूल गणवीर यांनी […]