👮 समता सैनिक दल 👮
रविवार, दिनांक ०६/०३/२०१६ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत बल्लारपूर शहरातील, गणपती वार्डामध्ये असलेल्या बौद्ध विहारात समता सैनिक दलातर्फे, विशेषत्वाने युवकांसाठी चळवळीविषयक जनजागृतीचा कार्यक्रम आयोजित केला होता. सभेस आयु. उराडे सर, प्रशिक आनंद यांनी चळवळीची दिशा आणि सद्यपरिस्थिती याविषयी चर्चात्मक मार्गदर्शन करून समता सैनिक दलाच्या बांधणीची अत्यावश्यकता विशद केली. तद्नंतर आयु. मेघराज काटकर सर यांनी युवकांपुधील शैषणिक, आर्थिक , सामाजिक आव्हाने आणि ती पेलविण्यासाठी संघटनात्मक करावे लागणारे प्रयत्न आणि त्यातून होणारा आमचा उद्धार तसेच रिपब्लिकन चळवळीची त्याअनुषंगाने पुनर्बांधणीची गरज हे विस्तृतपणे स्पष्ट केले.
कार्यक्रमात उपस्थित असलेल्या तरुणांनी स्वयंस्फुर्तीने त्यांची आजवर होत असलेली दिशाभूल मान्य करून नव्या उमेदीने आपल्या मातृ संघटनांची बांधणी करण्याची प्रतिज्ञाच केली याबद्दल समता सैनिक दल त्यांचे अभिनंदन करते. सदरहू कार्यक्रमासाठी खास नागपूरहून आलेल्या सैनिकांचे आयोजकांनी आभार व्यक्त केले आणि अशाप्रकारे कार्यक्रम यशस्वी ठरला.
समता सैनिक दल,
HQ, दीक्षाभूमी, नागपूर. www.ssdindia.org