01 एप्रिल २०१८ बौद्धिक व शारीरिक प्रशिक्षण शिबिर भुसावळ जळगाव


समता सैनिक दलाचे प्रशिक्षण शिबिर सम्पन्न…..

        दि.१/४/१८ रविवार रोजी भुसावळ जि. जळगाव येथे समता सैनिक दलाचे शारीरिक आणि बौद्धिक प्रशिक्षण शिबिर सम्पन्न झाले.
        समाजावर वाढत्या अन्याय अत्याचाराच्या घटना बघता येथील तरुण एका मंचावर येउन कार्य करण्याच्या उदात्त हेतूने संघटित झाला आहे. याकरिता त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संघटनेत ( घटनेनुसार )म्हणजे समता सैनिक दलातच कार्य करण्याचे ठरविले. त्याचाच परिपाक म्हणजे समता सैनिक दलाचे शारीरिक आणि बौद्धिक प्रशिक्षणाचे आयोजन.
प्रशिक्षणासाठी अकोला येथून समता सैनिक दलाचे अध्यक्ष आयु . प्रमोद सदांशीव, रवींद्र ढवळे सर,एस पी गायकवाड सर,प्रज्ञानांद थोरात सर, योगेस निखाडे यांना आमंत्रित करण्यात आले.
        संत गाडगेबाबा विद्यालयात घेण्यात आलेल्या या शिबिरात आयु . प्रमोद सदांशीव सरांनी समता सैनिक दलाच्या प्रत्येक कलमाची सविस्तर माहिती व रिपब्लिकन चळवळ उपस्थित असलेल्या २०० ते २५०  युवकांना दिली. सकाळी १० ते १२ बौद्धिक व १ ते १:३० या कालावधीत रविंद्र ढवळे सर, केदारे सर, भालेराव सर ( आर्मी सेवानिवृत्त ) सैनिकांनी तसेच इंगळे सरांनी तरुणांना कदमताल, मिलीटरी ड्रिल, सलामी सह शारीरिक कवायतीचे प्रशिक्षण दिले. त्यांनतर आयु . प्रमोद सदांशीव सरांनी शिस्त व गणवेशाचे मह्त्व पटवून दिले व उपस्थित सर्वांकडून समता सैनिक दलाची प्रतिज्ञा वदवून घेतली.
 रखरखत्या उन्हात मिलीटरी ड्रिल चे प्रात्यक्षिक हे विशेष आकर्षण होते.व या शिबिरात सर्वच गट तटातील कार्यकर्ते सहभागी होते.
      जयंती उत्सव समिती अध्यक्ष नरेंद्र मोरे हे अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अँड.पगारे सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आयु संजय बौद्ध, उमेश वाघ, उमेश चाबुकस्वार ( ब.स.पा. विधानसभा क्षेत्र अध्यक्ष ) नितीन मोरे,प्रबोधनकार ग्रुप चे सर्व पदाधिकारी, अनुज जोगदंड, नितीन बोदडे सर खडका,ढिवरे, वानखेडे, वाघमारे, तायडे,मोरे व सर्व सैनिकांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शन ने करण्यात आला.आयोजकांनी सर्वांची नास्ता, चहा व पाणी इ. ची चोख व्यवस्था केली.

समता सैनिक दल मुख्यालय : दिक्षाभुमी, नागपूर. (www.ssdindia.org)
संविधानिक रिपब्लिकन चळवळीच्या पुन्रबांधणी साठी कटिबद्ध!

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *