💥 रिपब्लिकन जनजागृती कार्यक्रम संपन्न💥
गुरूवार, दिनांक 27/7/2017 रोजी बौद्ध विहार, पंचशील वार्ड-4, दुर्गापूर क्षेत्र, चंद्रपूर येथे समता सैनिक दलाच्या वतीने आंबेडकरी बौद्ध अनुयायांत संघटनात्मक जनजागृती अभियानाचा भाग म्हणून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. समता सैनिक दलाची प्रतिज्ञा सामूहिकरीत्या घेऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली. सदर कार्यक्रमात आयु. प्रशिक आनंद यांनी बाबासाहेबांनी सांगितलेल्या सामाजिक आणि आर्थिक उद्धाराच्या गरजपूर्तीसाठी रिपब्लिकन पार्टीच्या राजकारणाचे महत्व उपस्थित जनसमुदायास पटवून दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु. शार्दूल गणवीर यांनी केले. कार्यक्रम सायंकाळी 8.00 वाजता सुरू झाला व रात्री 10 वाजता मराठीत पंचशील ग्रहण करून सम्पन्न झाला. सदर कार्यक्रमात समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ़ इंडिया चे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत सांगीतल्याप्रमाणे, रीतसर सभासद-पावती घेऊन संघटित झाले पाहिजे व आपल्या संघटना मजबूत केल्या पाहिजेत असे मत इतर कार्यकर्त्यांनी मांडलेत. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता विहाराचे अध्यक्ष आयु.अविनाश बेले, सचिव शैलेश सोनटक्के आणि समता सैनिक दलाचे कार्यकर्ते आयु. स्वप्निल भड़के, मुकेश हुमने, लोकेश रंगारी, प्रकाश वाळके, रघुनाथ बेले इत्यादींनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमात महिलांनी घेतलेल्या सहभागाबद्दल आणि कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल उपस्थितांचे आभार.
जय भीम
द्वारा : समता सैनिक दल,
शाखा-पंचशील वार्ड, दुर्गापूर क्षेत्र,चंद्रपूर
www.ssdindia.org