Speech on Republican, SSD Ulhasnagar Mumbai


शिकवा!        चेतवा!    संघटीत करा!

🌹 मनपूर्वक आभार 🌹

दि. १५/११/१५ रोजी उल्हासनगर, निब्बाण टेकडी परिसारात सकाळी ११ वा. काहींचा वेळ बूध्द विहारात जाण्या-येण्याचा तर काहींचा आराम करण्याचा तर काही शौकिनांचा मटन-मच्छी आणण्याचा,त्याच वेळी तक्षशिला विद्यालयात घड्याळाचे काटे मागे फिरले होते. भारताला स्वातंत्र कशे मिळाले ? ईंग्रज भारताला स्वातंत्र द्यायला १९१७ ला तयार झाले होते. !
मग ईतका ऊशीर का लागला भारतियांना स्वातंत्र्य घ्यायला ? का निर्माण झाला कम्यूनल डेड लॉक ? कोणि सोडवला कम्यूनल डेड लॉक ? कम्यूनल डेड लॉक म्हणजे काय ? का मिळाल २६ जाने. १९५० ला भारतियांना स्वातंत्र्य??त्यादिवशी ह्या देशाचे नाव रिपब्लिक ऑफ इंडिया असे का ठेवण्यात आले?
त्यासाठी संविधान हा contract का लागु करावा लागला?आणि तो कोणासाठी आहे?तसेच संविधान प्रस्तापित करण्याची जबाबदारी कोणाची? अशा विविध प्रकारच्या माहित नसलेल्या प्रश्नांची व्याख्यानाच्या अनुशंगाने ओळख झाली. ऐक एक झर झर इतिहासाचे पान ऊलगले सुमेध सरांनी.

मित्रांनो भारताचा ऐकमेव  शत्रू ब्राम्हणवाद नव्हे तर त्यांच्याच तोडीचा पूंजीवाद देखिल आहे. त्यांची विचारधारा मार्क्स वादी आहे. मार्क्स वादाला काय ऊत्तर आहे  आपल्याकडे ? मार्क्स हा political philosopher होता. मार्क्सवाद म्हणजे पोटाचा प्रश्न सोडवण्याची प्रक्रिया FDI ( पूंजीवाद ) तर लागू झाला. काही मित्रांना याची कल्पना नाही की राजकारण आणि धर्मकारण वेगळे नाहीत. यासाठीच डॉ. बाबासाहेबांनी मार्क्स ला ऊत्तर दिले जे हजारो वर्षापूर्वी संशोधलेल तत्वज्ञान आहे. त्यासाठी त्यांनी एक निबंध लिहला “बूध्द की कार्ल मार्क्स”. बूध्दाचा धम्म तूम्हाला स्वाभिमान देतो फक्त पोटाचा प्रश्न सोडवण्यात काही अर्थ नाही.
सुमेध सरांनी वेळोवेळी रिपब्लिकन जनतेची जबाबदारी काय आहे याची आठवण करून दिली.  ऐवढेच नाही तर वेगवेगळे संघटन निर्माण ऊपयोग काय? त्याचे काय नूकसान आहे हे देखिल सांगीतले. तसेच बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या संघटना चालवण्यात येथील जनतेस का जमत नाही.!
भारतीय संविधान समता,स्वांतञ,बंधुता आणि न्याय ह्या तत्वप्रणालीवर आधारित लोकशाही पद्धत यापूर्वी होती ती का नष्ट झाली ? ती कशी प्रस्थापित होईल यासाठी डॉ. आंबेडकरांना जागोजागून शाळा, कॉलेजेस महाविद्यालयांत बोलावले जात होते. त्यांनी दिलेले स्पीचेस ऊपलब्ध आहेत. रिझर्वेशन (आरक्षण)च्या मूद्यावर आपण फेल झाले आहोत. हार्पिक पटेल ने RSS च्या संगनमताने त्यावर घणाघाती आघात केला आहे. आपण कूठे आहोत ? याच ऊत्तर पण आहे “A plea foreigner” तेही डॉ. आंबेडकरांच्याच साहीत्यात सापडते.
मित्रांनो ऐकंदरीत सुमेध सरांचा लेक्चर म्हणजे आपल्या प्रज्ञे मध्ये भर होय.
बुद्धांनी सांगितलेली प्रन्या,शिल आणि करूना हि तत्वे खरोखर बुद्ध विहारात शिकवली जातात का? आपला समाज फक्त हिंदु संस्कृतीची Copy cat तर नाही करत?? अशे प्रश्न केले , तसेच बौद्ध समाजाने १९५६ नंतर कोणती नविन संस्कृती आणि बाबासाहेबांनानी सांगितलेल्या Missionary Team बनवुन बुध्द धम्माचा प्रचार- प्रसार केला का?? अशे किती Missionary Team तयार केली आणि देश-विदेशात पाठवली ???अशे प्रश्न करून चेतवा (Agitate)ही भुमीका मांडली..
प्रज्ञेच महत्व त्यांच्या लेक्चर मधून अधिक दिसून आलं आणि त्याच वेळेला प्रज्ञेचा वेगळा अर्थ काढणार्या काही अभ्यासकांच्या देखिल ते लक्षात आलं..
शेवटी..राष्टीय जिवनचे महत्व आणि राष्टीय जिवन निर्माण होण्यास देशाला डॉ.बाबासाहेबांनची गरज का भासली तसेच संविधानची निर्मीती बाबासाहेबांन कडुन होण्यास भारतात अशी कोणती प्ररस्थिती निर्माण झाली व १९४७ साली शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या वत्तीने डॉ बाबासाहेबांनानी पुणे सत्याग्रह का केला व त्यांची गरज का भासली? अशे अनेक प्रश्न निर्माण करून त्याविषयी सविस्तर माहीती सांगितली.
——————————
मार्गदर्शक- सुमेध ऊके. (M.Tech IIT, LL,B, Master in Political science, Currently doing Phd on Theorizing Dr.Ambedkar.)
काल त्यांनी त्यांचा दर रविवारचा  क्लास तक्षशिला विद्यालय उल्हासनगर 9ते11 पर्यत्न घेतला व नंतर लगेच संविधान दिनानिमित्त समता सैनिक दला तर्फे आयोजित व्याख्यानमालेस सुरूवात केली, विषय- डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि राष्टीय जिवन. विषयाला ११:२०मिनिटांनी सुरुवात केली ती ४ वाजता संपवली त्यांचे एक आणि एक वाक्य reference च्या आधारे होते , सुमेथ सरांनची  व्याखान ऐकण्यात सर्व ऐवढे मग्न झाले की कधी ४ वाजले हे ही समजले नाही, सरांनी न थांबता पुर्ण विषय हाताळला व डॉ.बाबासाहेबांनचे 1 to 21 volumes, Writing & Speeches  वाचणास सांगितले व त्यावर सार्वजनिक चर्चासत्र आयोजित व्हावे अशी इच्छा व्यक्त केली.
अतिशय आत्मीयतेने मार्गदर्शन करणार्या सुमेध सरांचे पून्हा हार्दिक आभार व व्याख्यानमालेस आलेल्या सर्वांचे अभिनंदन तसेच व्याख्यान आयोजित करतांना ज्यांनी मदत केली त्या सर्वांचे आभार.

समता सैनिक दल
शाखा : ऊल्हासनगर ( मुंबई )
09324127909.
08655582188.

( रिपब्लिकन चळवळीच्या पुनर्बांधणी साठी कटीबध्द )15 Nov 2015 Mumbai 1 15 Nov 2015 Mumbai 2

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *