स्वतंत्रता, समानता आणि बंधुत्वता; या मूल्यांवर आधारीत समाजाची निर्मिती करण्याकरिता घर तेथे सैनिक व गाव तेथे शाखा बांधणी करीता आजच्या तरुण पिढीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिलेले सामाजिक संघटन समता सैनिक दलात वय वर्ष 18 पूर्ण झालेल्या तरुणाने सभासदत्व स्विकारून आपले मूळ संघटन मजबुत व सशक्तीकरण करण्यासाठी , समाजाला जागृत व समाजाच्या रक्षणासाठी पुढे येऊन आपली जबाबदारी स्विकारली पाहिजे.त्या अनुषंगाने समाजात आव्हान करण्यात आले. सभासद नोंदणी करताना भारतामधून आलेल्या अनेक राज्यातील लोकांशी संपर्क साधता आला.
6 डिसेंबर 2017 रोजी चैत्यभूमी,शिवाजी पार्क दादर येथे समता सैनिक दलामार्फत सामुहिकरित्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली. तसेच चैत्यभूमी दादरला येणाऱ्या आपल्या समाजबांधवांनी शिवाजी पार्क, दादर येथे आपल्या समता सैनिक दलाच्या स्टॉल क्रमांक 273 ला भेट देऊन सभासदत्व स्वीकारले आणि SSD चे ID तयार करून दलामार्फत तेथे सेवा सुद्धा दिली.
खऱ्या अर्थाने 5 डिसेंबर रोजी अचानक झालेल्या वातावरणाच्या बदलामुळे ओखी वादळ आले आणि मुंबईत भरपूर पाऊस पडला,दादर मधील शिवाजी पार्क संपूर्ण जलमय झाले.त्यात भिमानुयायी यांचे अतोनात हाल झाले अशा परिस्थितीत आपल्या समता सैनिक दलाच्या सैनिकांनी पुढाकार घेऊन यथाशक्ती त्यांना सहाय्य केले.
समता सैनिक दलाच्या या कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिकपणामुळे अभिमान वाटतो. त्या सर्व सैनिकांचे दलाकडून कौतुक करण्यात येत आहे. तसेच 1 जानेवारी 2018 रोजी भीमाकोरेगाव, पुणे या शौर्यभूमीच्या ठिकाणी सर्व सैनिकांना मानचिन्ह 🏅 देऊन गौरविण्यात येणार आहे.💐💐
समता सैनिक दल
मुख्यालय : दीक्षाभूमी, नागपूर
www.ssdindia.org