शिकवा❗चेतवा ❗आणि संघटित करा‼
समता सैनिकांची बाबासाहेबांना मानवंदना
मित्रांनो,
सप्रेम जयभीम, दि. ६ डिसें. डॉ. आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी चैत्यभुमी येथे दरवर्षीप्रमाणे बाबासाहेबांना मानवंदना देण्यासाठी जनसागर लोटला. लाखोंच्या संख्येने बाबासाहेबांचे अनुयायी महापरिनिर्वाणदिनी चैत्यभुमीवर हजर होते. समता सैनिक दलाच्या वतीने स्वयंसेवी कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांना सकाळी ८:१५ ला मानवंदना दिली. ही वेळ महाराष्ट्र शासनाने ठरविल्याचे BMC चे अधिकारी आयु. राजेंन्द्र लोखंडे सर यांनी कळवले होते. सर्व स्वयंसेवी समता सैनिकांनी आपआपली जबाबदारी चोखपणे पार पाडली, त्याबद्दल या सर्व स्वयंसेवी कार्यकर्त्यांना ग्रँड सैलूट. विशेष म्हणजे स्त्रीयांनी नोंदवलेला सहभाग महत्वपुर्ण होता. सर्वांनी सुरक्षा-व्यवस्था बनून रहावी म्हणून अपार मेहनत घेतली व कोणतेही गालबोट न लागता जनसागर आपआपल्या ईच्छीत स्थळी परतीला निघाला.
वर्ष २०१६ चा बाबासाहेबांचा महापरिनिर्वाणदिन हा SSD व बाबासाहेबांना अपेक्षित बुध्द यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वपुर्ण ठरला. याच वर्षी पहिल्यांदा गेल्या ६० वर्षानंतर बाबासाहेबांना मानवंदना देण्यासाठी आलेल्या जनसागराने SSD चा घटनेनुसार अधिकृत झेंडा पाहीला व अजेंडाही पाहीला. याची प्रचिती समता सैनिक दलाने दादर, शिवाजी पार्क येथे लावण्यात आलेल्या स्टॉलवरुन आली. दुरवरून संपुर्ण भारतभरातून येणारे बाबासाहेबांचे अनुयायी समता सैनिक दलाची घटना जाणून घेत होते. जी SSD ची घटना आज पर्यंत म्हणजे ६० वर्षांपासून बाबासाहेबांच्या अनुयायांना आपल्या समाजातील बुद्धिजीवी वर्गाने अपवाद वगळता, पुढाकार घेऊन दाखविली नाही, विशद करून सांगण्यात आली नव्हती त्या कामास तरुण पिढी सरसावली आहे हे बघून प्रत्येकाला अभिमान वाटत होता. समता सैनिक दलाच्या चैत्यभुमी येथील स्टॉल वर समता सैनिक दलाची घटना, बुध्दीस्ट सोसायटी ऑफ ईंडियाची घटना तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ ईंडिया ची जगातील सर्वश्रेष्ठ तत्वप्रणाली जनसाामान्यांसाठी उपलब्ध करण्यात आली होती. आयु.मेघराज काटकर यांनी मांडलेली एक पानी सहजसुलभ समजणारी रिपब्लिकन चळवळ तसेच संपुर्ण घटना असा त्यात समावेश होता. डॉ.बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या संघटनांच्या (RPI, SSD & TBSI) घटनेनुसार समाजाने वागावे असे बाबासाहेबांचे स्पष्ट मत होते. ज्याप्रमाणे सर्व भारतियांना भारतिय संविधानानुसार वागायला हवे तसेच बाबासाहेब सुचवितात की समाजाने या संघटनांच्या घटनेनुसार वागायला हवे. बाबासाहेब गेल्यानंतर बाबासाहेबांनी दिलेल्या चळवळीची जी वाताहत झालेली आहे तिला पुर्वपदावर आणण्यासाठी दलाचे केद्रिय प्रवक्ता- प्रशिक आनंद यांचे आपली नेमकी चळवळ कोणती ? हे लेखरूपी छोटेखानी पुस्तक प्रकाशित करण्यात आले. समता सैनिक दलाची सर्व भारतीय चळवळ्यांना विनंती आहे की त्यांनी ते पुस्तक जरूर वाचावे व बाबासाहेबांच्या चळवळीची योग्य दिशा समजून घ्यावी तसेच काही सुचना असल्यास सुचवाव्यात. बाबासाहेब गेल्यानंतर चळवळीच्या इतिहासातिल अनेक पाऊलांपैकी हे हि एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हटले तर ते वावगे ठरणार नाही असा वाचकांचा अभिप्राय आहे. सदर पुस्तक वाचल्यानंतर ते आपणांस खात्रीपुर्वक ऊमजेलच.
ऐतिहासिक प्रसंग म्हणूनही २०१६ या बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणदिनाची नोंद झालेली आहे मित्रांनो. प्रत्यक्षदर्शी असलेल्या सर्व सैनिकांना आपण बाबासाहेबांनी आम्हा लेकरांना दिलेला चळवळीचा रथ पुढे नेण्यासाठी सरसावलो आहेत याचा सार्थ अभिमान वाटतो आहे. प्रबुध्द भारत या बाबासाहेबांच्या वृत्तपत्राच्या दिक्षा-विशेषांकाच्या पहिल्याच पानावर बाबासाहेबांनी बुध्दाचे दिलेले उघड्या डोळ्याचे चित्र छापण्यात आले होते. ज्याला बाबासाहेबांनी The Light Of The World हे शिर्षक दिले आहे, ज्याचा अर्थ जगाचा प्रकाश असा होतो.
हा जगाचा प्रकाश आजपावेतो बाबासाहेबांच्या अनुयायांपर्यंत पाहिजे त्या प्रमाणात किंबहुना अगदीच नगण्य स्वरूपात पोहोचला असल्याचे चित्र समाजात दिसते. तो यावेळेस समता सैनिक दलाने जाहीररित्या समाजापुढे मांडण्याचा, त्याचा प्रामाणिकपणे प्रचार प्रसार करण्याचा यथासांग प्रयत्न केला. तसेच सर्वांना सांगण्यात आले की पारंपारिक बुध्दिजम सोडून बाबासाहेबांनी दिलेला बुध्दिजम स्विकारावा. त्यासाठी SSD स्टॉल वर बाबासाहेबांनी दिलेले ऊघड्या डोळ्याच्या बुध्दाचे चित्र फ्रेम करून घरोघरी पोहचावे या उद्देशाने ठेवण्यात आले होते.
वरिल 👆🏼सर्व गोष्टिचा आढावा घेण्यासाठी आवाज India News Channel ने प्रथमच समता सैनिक दलाच्या स्टॉलला भेट देऊन सर्व माहीती मिळवली तसेच समता सैनिक दलचे सैनिक अरियं बौद्ध यांची दलाच्या मार्फत एक मुलाखतही घेण्यात आली, त्या मुलाखतीत त्यांनी स्पष्टपणे दलाचा झेंडा-अजेंडा, रिपब्लिकन चळवळीची दिशा आणि डॉ.बाबासाहेब यांना अभिप्रेत असणारा बौद्ध धम्म हे जाहीरपणे मांडले.
द्वारा प्रसारित :
समता सैनिक दल
www.ssdindia.org
Join SSD
📞9324127909
📞8655582188
(रिपब्लिकन चळवळीच्या पुणर्बांधणीसाठी कटिबध्द)