💥 चंद्रपूर जिल्ह्यातील उर्जानगर परिसरात रिपब्लिकन चळवळ-जनजागृती कार्यक्रम संपन्न 💥
बुधवार, दिनांक ७/११/२०१८ रोजी रात्री ८ ते १० वाजता चंद्रपूर जिल्ह्यातील, उर्जानगर परिसरातील वार्ड क्रमांक ६ मध्ये असलेल्या आंबाडवे बौद्ध विहारात, समता सैनिक दलाच्या वतीने आंबेडकरी बौद्ध अनुयायांत ‘रिपब्लिकन चळवळ – जनजागृती अभियाना’ अंतर्गत कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयु. शार्दूल गणवीर यांनी केले तर उपस्थितांना नागपूर येथून आलेले आयु. प्रशिक आनंद यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी बाबासाहेबांनी समाजाच्या उद्धारासाठी दिलेल्या रिपब्लिकन चळवळीच्या तीन मूलगामी संघटनांवर (RPI, SSD, BSI) मार्गदर्शन करण्यात आले. समाजाने आता रिपब्लिकन चळवळ पूर्ववत सशक्त करून समाज संघटित करण्याकडे वाटचाल केली पाहिजे असे त्यात ठरविण्यात आले. तद्वतच समता सैनिक दलाची शाखा बांधणी करण्याच्या दिशेने उपस्थित स्त्री-पुरुषांनी सकारात्मकता दर्शविली व सदस्यता स्वीकारून रिपब्लिकन चळवळीची लाट निर्माण करण्यासाठी समता सैनिक दलाचे अधिकाधिक सामर्थ्य निर्माण करण्याचा त्यांनी प्रण केला. लवकरच शाखेची (कार्यकारिणी) स्थापना करण्याचे ठरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयु. शार्दूल गणवीर यांनी केले तर आभार प्रदर्शन आयु. सहारे यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता समता सैनिक दल, चंद्रपूर येथील पदाधिकाऱ्यांच्या वतीने परिश्रम घेणारे प्रामुख्याने आयु. संदीप देठे, अविनाश बेले, मुकेश हुमणे तसेच अन्य कार्यकर्ते व महिलांनी पुढाकार घेतला. सुसंवाद साधून जनजागृती कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल उपस्थित सर्व समाज बांधवांचे आभार.
जय भीम
द्वारा : समता सैनिक दल,
शाखा- दुर्गापूर परिसर, जिल्हा चंद्रपूर
(HQ, दीक्षाभूमी नागपूर यांचेशी संलग्नित)
www.ssdindia.org