💥 रिपब्लिकन जनजागृती कार्यक्रम संपन्न💥
बुधवार, दिनांक 30/08/2017 रोजी बोधिसत्व बौद्ध विहार, WCL कॉलनी, शक्तीनगर, चंद्रपूर येथे समता सैनिक दलाच्या वतीने आंबेडकरी बौद्ध अनुयायांत संघटनात्मक जनजागृती अभियानाचा भाग म्हणून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमात आयु. प्रशिक आनंद यांनी, समाज मोडकळीस आलेला असतांना बाबासाहेबांनी सांगितलेल्या सामाजिक आणि आर्थिक उद्धाराच्या गरजपूर्तीसाठी रिपब्लिकन पार्टीच्या राजकारणाचे अनन्यसाधारण महत्व उपस्थित जनसमुदायास पटवून दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु. शार्दूल गणवीर यांनी केले.
कार्यक्रम सायंकाळी 8.00 वाजता सुरू झाला व रात्री 10 वाजता सम्पन्न झाला. सदर कार्यक्रमात समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ़ इंडिया चे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत सांगीतल्याप्रमाणे, रीतसर सभासद-पावती घेऊन संघटित झाले पाहिजे व आपल्या संघटना मजबूत केल्या पाहिजेत असे मत व्यक्त करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता विहाराचे अध्यक्ष आयु. तितरे सर, उपाध्यक्ष आयु. तागडे सर, कोषद्याक्ष आयु. संजय मेश्राम सर, सदस्य आयु.वानखेड़े सर व इतर पदाधिकारी, महिला मंडळाच्या अध्यक्षा आयु. खोंड मॅडम व महिला उपासक संघ व आदरणीय भंते जी ,वार्ड क्र 3 चे SSD चे सदस्य, शार्दुल गणवीर, मुकेश हमने, प्रवीण गायकवाड़, लोकेश रंगारी, अंकुश रायपूरे, प्रकाश वाळके, ईश्वर ब्राह्मणे, वार्ड क्र 2 चे शैलेन्द्र बेलसरे, एस कुमार सोनटके, वार्ड क्र 4 चे अविनाश बेले, शैलेश सोनटके,रघुनाथ बेले गुरुदास मेश्राम, विनोद भड़के, स्वप्निल भड़के, आयु.अविनाश बेले, सचिव शैलेश सोनटक्के इत्यादी समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमात महिलांनी घेतलेल्या सहभागाबद्दल आणि कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल उपस्थितांचे आभार.
जय भीम
द्वारा : समता सैनिक दल,
शाखा-पंचशील वार्ड, दुर्गापूर क्षेत्र, चंद्रपूर
www.ssdindia.org