रिपब्लिकन चळवळीच्या (RPI, SSD, BSI) पुनर्बांधणी साठी समता सैनिक दलाच्या एका गटात चार वर्षांपासून कार्यरत राहून बाबासाहेबांनी जन्मास घालून दिलेल्या मूलगामी तात्विक संघटनांचा जनमानसात प्रचार-प्रसार करण्याचे कार्य आजवर सुरूच ठेवले आहे. रिपब्लिकन चळवळ उभारणे हे ध्येय उराशी बाळगणाऱ्या समता सैनिक दलाच्या अन्य गटांनी एकत्रितरित्या, एक संघटन म्हणून कार्य करावे असे अगदी सुरुवातीपासूनच अपेक्षित असले तरी ते घडतांना मात्र फारसे दिसत नाहीये. तेव्हा आता यावर विचार करता आपण स्वतःच दोन पाऊले मागे घेऊन दुसऱ्या गटात सामील होऊन कोणत्याही एकाच गटाची शक्ती वाढविणे अधिक शहाणपणाचे होईल असे वाटत असल्याने इतर गटांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचे सुरू केले आहे. याचाच एक भाग म्हणून मागील रविवारी दि.०८/०७/२०१८ रोजी नागपूर येथे अनेक वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी एक अनौपचारिक सकारात्मक चर्चा पार पडली. जे-जे #समाजोपयोगी व #समाजहितार्थ आहे ते-ते करणे आपले कर्तव्य आहे अशी बाबासाहेबांची शिकवण आहे. तेव्हा पुढील वाटचाल यशस्वी होण्याकरिता या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.
जय भीम
HQ: दीक्षाभूमी, नागपूर (ssdindia.org)