२२/०७/२०१८ बुद्धधम्म व ‘आरपीआय’ चे तत्वज्ञान यावर प्रबोधनाचा कार्यक्रम संपन्न


💥 बुद्धधम्म व ‘आरपीआय’ चे तत्वज्ञान यावर प्रबोधनाचा कार्यक्रम संपन्न 💥

रविवार, दिनांक २२/०७/२०१८ रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या पुनर्बांधणीसाठी कटिबद्ध असलेल्या समता सैनिक दल, शाखा दुर्गापूर, जिल्हा चंद्रपूर यांच्या वतीने धम्मकीर्ती बौद्ध विहार, नगीनाबाग, चंद्रपूर येथे सकाळी १० वाजता बुद्ध तत्वज्ञानावर आधारित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. समता सैनिक दल, HQ दीक्षाभूमी नागपूर येथील कार्यकर्ते आयु. प्रशिक आनंद यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी तथागत बुद्ध हे जगातील सर्वश्रेष्ठ राजकीय व आर्थिक तत्वज्ञ होत हे विशद करून ते तत्वज्ञान बाबासाहेबांनी आपल्या ‘आरपीआय’ या राजकीय पक्षाचे तत्वज्ञान म्हणून मानवी कल्याणार्थ स्वीकारले आहे हेही उपस्थितांना निदर्शनास आणून दिले.

तसेच प्रबुद्ध भारत राष्ट्र निर्मितीसाठी रिपब्लिकन चळवळीची पुढील वाटचाल जोमाने होणे गरजेचे आहे ही बाब आवर्जूनपणे आपल्या वक्तव्यातून मांडली. शिबिरात तरुणांचा व महिलांचा सहभाग हा लक्षणीय होता. प्रशिक्षण शिबिराच्या यशस्वीतेसाठी दुर्गापूर शाखेच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या परिश्रमाबद्दल व विहाराच्या पदाधिकाऱ्यांचे आभार.

द्वारा : समता सैनिक दल,
शाखा-दुर्गापूर, जिल्हा चंद्रपूर
www.ssdindia.org

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *