Collective Study at Ulhasnagar Mumbai 08 Nov 2015


आज दि. ०८ नोव्हेंबर २०१५, समता सैनिक दला तर्फे विश्वधम्म बूध्द विहार ऊल्हासनगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे रायटींग अँड स्पीचेस चे २१ खंड(हिंदी) केंन्द्र शासनाने प्रकाषित केलेली पुस्तके तसेच बौद्ध धम्माचे पुर्णपणे आकलन होण्यासाठी
1). “The Buddha and His dhamma”
2) बुद्ध की कार्ल मार्क्स
3) प्राचीन भारतातील क्रांती- प्रतिक्रांती.
हे तीन ग्रंथ देखील  दान म्हणून देण्यात आले. निमित्त होते वर्षवास सांगता समारोप.
सदर कार्यक्रमात ज्येष्ठ ऊपासिका शिलाताई जाधव यांनी सर्वांना ऊत्तम मार्गदर्शन केले व बुध्द धम्मामधुन मानवी विकास कशाप्रकारे होऊ शकतो त्यासाठी उपाय-योजना ही सांगितल्या तसेच अनेक उदाहरणे देऊन पटवून दिले.
मित्रांनो, त्यानंतर समता सैनिक दल चे सैनिक- मंगेश वानखडे यांनी डॉ.बाबासाहेब लिखित  Writing & Speeches, २१खंड याबाबत माहीती देऊन , खालील मुद्दे मांडले. बाबासाहेबांचे हजारो करोड रुपयांचे स्मारकं बनवले जातात परंतू त्यांची ग्रंथसंपदा प्रकाषित केली जात नाही, सरकार ते करणार नाही कारण जनजागृती त्या मार्फत होऊ शकते व समानता प्रस्थापित करण्यासाठी लोकसमूह पेटून ऊठू शकतो. तसेच वारंवार सरकारला ग्रंथ छापावे असे निवेदन देऊनही ते दूर्लक्ष करत आहे. जेव्हा की याच ग्रंथांची विक्रमी विक्री होत असते आज पर्यंत ९० करोड रु. सरकारला यातून ऊत्पन्न मिळाले आहे. परंतू तथाकथीत बाबासाहेबांचे अनुयायी ते का करू शकत नाहीत ? त्यांना का ते कराव अस वाटत नाही ? अस नाही की कोणालाच त्याची जाण नाही काही जण तसा प्रामाणिक प्रयत्नही करत आहेत. परंतू काही लोक अनुवादाच्या नावाखाली भेसळयुक्त ग्रंथ पूरवत आहेत. बाबासाहेबांनी त्यांच्या साहीत्याविषयी स्पष्ट म्हटल होतं की माझ्या नंतर हीच ग्रंथसंपदा तूम्हाला मार्गदर्शक ठरेल. त्यानूसार आपण सर्व त्यांच्या साहीत्याच स्वच्छ अनुवाद किंवा विकत घेऊन अल्पदरात किंवा मोफत त्यांच वाटप कराव ही विनंती. हा ऊपक्रम येत्या काळात आम्ही ऊल्हासनगरच्या सर्व  बूध्द विहारात घेणार आहोत.

तसेच,
समता सैनिक दल चे सैनिक- निलेश कदम यांनी देखील बुद्ध धम्म आकलण्यासाठी  डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ३ ग्रंथ दिले आहेत त्यांची माहीती The Buddha and his dhamma या ग्रंथाचा प्रस्तावणेत लिहीली आहे, पंरतु आमच्या सर्व विहारामध्ये भेसळ स्वरूपाचे ग्रंथ असल्यामुळे हि प्रस्तावना पुस्तकात नाही त्यांमुळे योग्य माहीती भेटत नाही, त्यामुळे इतर ग्रंथाचे वाचन कधी झालेच नाही.
हे ग्रंथ बाबासाहेबांनानी का लिहीले ? व धम्म दिक्षा घेतल्यानंतर बाबासाहेबांनची कोणती उद्दिष्टे आणि स्वप्न होती ? ती कशाप्रकारे साध्य करता येईल ? यांबद्दल माहीती दिली.

समता सैनिक दल
शाखा : ऊल्हासनगर ( मुंबई )
9324127909.
8655582188.

(रिपब्लीकन चळवळीच्या पूनर्बांधणी साठी कटीबध्द)Mumbai 08 Nov 2015 1 Mumbai 08 Nov 2015 2

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *