समता सैनिक दलाच्या वतीने “ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याचे सामूहिक चर्चात्मक अध्ययन ” ::
विषय :- धम्मचक्र प्रवर्तन का ? नागपूर , दि १५ ऑक्टोबर १९५६ ला दीक्षा समारंभानंतर दिलीले डॉ. बाबासाहेब
आंबेडकरांचे भाषण .
जय भिम …
बाबासाहेबांनी धम्मचक्र प्रवर्तन का केले , त्याची जरुरी का होती व त्याने काय साध्य झाले याची छाननी करून घेण्याकरिता
दि. ११ ऑक्टोबर २०१५, रविवार रोजी, दीक्षाभूमि , नागपुर येथे समता सैनिक दलाच्या वतीने “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याचे सामूहिक चर्चात्मक अध्ययन ” (Collective Study) या नियमित आठवडी अभ्यासवर्गा अंतर्गत “ धम्मचक्र प्रवर्तन का ? ” या बाबासाहेबांच्या ऐतिहासिक , स्फूर्तीदायक व ओजस्वी भाषणावर सामुहिक अभ्यास करण्यात आला . त्याचे काही मुद्दे खालीलप्रमाणे होत्ते .
१) नागपूर का निवडले ? काही लोक असे म्हणतात कि RSS ची मोठी पलटण नागपूर येथे असल्यामुळे त्यांच्या उरावरती म्हणून बाबासाहेबांनी दीक्षा समारंभ नागपूर शहरात घेतला . हे मुळीच खरे नाही . असे करण्याचे कारण असे कि भारतात बौद्ध धम्माचा प्रसार जर कोणी केला असेल तर तो नाग लोकांनी केला. असे आपण नाग लोक आहोत. नाग लोकांची मुख्य वस्ती नागपूर येथे व आसपास होती असे दिसते. म्हणूनच या शहरास नाग-पूर म्हणजेच नागांचे गाव म्हणतात. हे स्थळ निवडण्याचे हे मुख्य कारण होते.
२) इज्जत प्यारी , लाभ प्यारा नाही. हे समजवून सांगतांना बाबासाहेब बोलतात कि मुंबईतील काही व्यभिचारी बाया सकाळी ८ ला उठल्या कि न्याहारीसाठी शेजारच्या हॉटेलात वर्दी देतात आणि म्हणतात , “ सुलेमान, अरे खिम्याची प्लेट व पावरोटी घेऊन ये .’’ पण माझ्या दलित वर्गीय भगिनिन्ना साधी चटणीभाकर देखील मिळत नाही ; मात्र त्या इज्जतीने राहतात . त्या सदाचारानेच राहतात. म्हणजेच मनुष्याला इज्जत प्यारी असावी , लाभ प्यारा नसावा. अश्याचप्रकारे
अ) टीका करणाऱ्यांनी पोरकटपना सोडून प्रौढ बनावे
आ) आम्ही बौद्ध धाम्मीय झालो तरी राजकीय हक्क मी मिळवीन याची खात्री बाबासाहेब करतात.
इ) बाबासाहेब भाषणातून मांडतात कि “मी हिंदुधर्मात जन्मलो तरी हिंदुधर्मात मरणार नाही’’ अशी प्रतिझा मी मागेच केली होती आणि काल मी तरी खरी करून दाखविली. मला इतका आनंद झाला आहे कि नरकातून सूटलो असे मला वाटते.
ई) कार्ल मार्क्सचा पंथ व आम्ही .
उ) रेडा , बैल व माणूस.
ऊ) उत्साहाचे मूळ, सुसंस्कृत मन. इत्यादी मुद्दे अभ्यासिले.
उर्वरित भाग पुढील रविवारी घेण्याचे सर्वांनी एकमताने ठरविले .
इछुकांनी या वर्गात सहभागी होण्यासाठी खालील भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
9970898880 , 9403591407
सामूहिक अध्ययनाची वेळ :- दर रविवारी सकाळी ९.०० ते ११.०० दीक्षाभूमि , नागपुर .
अधिक माहितीसाठी www.ssdindia.org या संकेतस्थळावर संपर्क साधावा.
शिकवा, चेतवा आणि संघटीत करा !