दि. ०३ जाने २०१६, शासनकर्ती जमात बनणे हेच आमचे उद्दिष्ट आणि आकांक्षा


👮 समता सैनिक दल  👮

रविवार दि.३ जानेवारी २०१६ रोजी, दीक्षाभूमी, नागपूर येथे, डॉ. बाबासाहेबांच्या साहित्यावर चर्चात्मक अध्ययनाचा भाग म्हणून खालील विषयावर अभ्यासात्मक चिंतन करण्यात आले.

‘शासनकर्ती जमात बनणे हेच आमचे उद्दिष्ट आणि आकांक्षा’ (खंड 18, भाग 2)

दि. २४ सप्टेंबर १९४४ ला शे.का.फे.च्या विध्यमाने मद्रास इलाख्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले भाषण ज्यात बाबासाहेबांनी सांगितले कि, “ब्रिटीश सरकारने हिंदुस्थानला राष्ट्रस्वातंत्र्याकडे स्वतःच्याच विशिष्ट मार्गाने जाऊ द्यावे. त्यांच्या पासंडीला हिंदी संस्थानिकांना जोडून त्यांचे भवितव्य गुंतागुंतीचे करू नये.” यानुसार नामदार शास्त्रीनी ब्रिटीशांच्या पुढे संस्थानिकांच्या प्रजेची बाजू मांडावयास हवी होती परंतु झाले उलटेच. खरे पाहता गांधी जर प्रामाणिक असते तर हिंदी संस्थानिकातील जनतेची त्यांच्या संस्थानिकांच्या जुलुमापासून सुटका व्हावी या तत्वानुसार ते वागावयास हवे होते याउलट गांधीनी सांगितले कि, संस्थानिकांनी प्रतिनिधींची पसंती करण्यास त्यांची मान्यता आहे ! यावरून गांधींना राजकीय ज्ञान कमी असल्यामुळे  राजकारण फार थोडे कळत होते असे स्पष्ट मत बाबासाहेब आपल्या भाषणात मांडतात. त्यातच गांधी हे पहिल्या गोलमेज परिषदेला अनुपस्थित होते तेव्हा त्यातील खाच खळगे, बऱ्यावाईट, खोट्यानाट्या गोष्टी त्यांना कळाव्यात म्हणून बाबासाहेबांनी ताप आल्याचे निमित्त करून लॉर्ड चान्सेलर साहेबांकडून प्रथम बोलण्याची परवानगी मागितली व जवळजवळ दीड तास बोललेत आणि तापाचे निमित्त खरे भासविण्यासाठी निघून जाणे भाग होते म्हणून निघून गेलेत आणि गांधी त्या परिषदेत काय बोललेत याची रिपोर्ट हाती येईपर्यंत वाट बघत राहिले. रिपोर्ट हातात आल्यावर बघतात तर काय,श्री.गांधी म्हणे  ” माझ्या मनाला डॉ. आंबेडकरांचे म्हणणे पटते पण बुद्धीला पटत नाही.” यावरून गांधीची कपटबुद्धीची राजकारणी वृत्ती स्पष्ट होते. बाबासाहेबांनी आवर्जुनपणे ब्रिटीशांपुढे अस्पृश्य समाज हा हिंदुस्थानचा एक स्वतंत्र घटक आहे आणि त्यासाठी त्यांनी त्यांच्या वेगळ्या मागण्या मागितल्या होत्या ज्याला गांधीचा तीव्र विरोध होता. तेव्हा बाबासाहेब आपल्या समाजबांधवांना आपले उद्दिष्ट निट समजावून सांगतांना म्हणतात, ” शासनकर्ती  जमात बनणे हेच आमचे उद्दिष्ट व आकांक्षा आहे. तुमच्या घराच्या भिंतीवर ते कोरून ठेवा. त्यासाठी आपण स्वतःवरच विश्वास ठेवला पाहिजे. आपण आपली जोरदार संघटना केली पाहिजे.आपण सर्व एका राजकीय संघटनेमध्ये जमलो पाहिजे व जगाला आपली एकजूट दाखवून दिली  पाहिजे.

(विशेष टीप: पुढे ३० सप्टेंबर १९५६ रोजी बाबासाहेबांनी दिल्लीला आपल्या राहत्या घरी अ.भा.शे.का.फे. च्या राष्ट्रीय कार्यकारिणीसमक्ष शे.का.फे. ला बरखास्त करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या नव्या राजकीय पक्षाचे स्थापना केली.)

सामुहिक चर्चात्मक अध्ययनाची वेळ, दर रविवारी सकाळी ९ ते ११. स्थळ: दीक्षाभूमी

अधिक माहिती साठी खालील संकेतस्थळावर संपर्क करा. www.ssdindia.org

शिकवा, चेतवा आणि संघटित करा !

समता सैनिक दल,
HQ, दीक्षाभूमी, नागपूर.

(रिपब्लिकन पार्टीच्या पुनर्बांधणीसाठी साठी कटिबद्ध)deekshabhoomi 03 jan 2016 1 deekshabhoomi 03 jan 2016 2

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *