शिकवा चेतवा आणि संघटीत करा
२६ जाने. २०१७ रोजी चेंबूर ( मुंबई ) येथे समता सैनिक दल टिम मुंबईच्या वतीने रिपब्लिकन भारत देशाचा ६८ वा रिपब्लिक दिन साजरा करण्यात आला. सकाळी १०:३० वाजता वरिष्ट पोलिस निरिक्षक आयु. अहिरे सरांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण करण्यात आले. तद्नंतर भारतिय संविधानाच्या प्रास्तिविकेचे सामुहिक वाचन आणि समता सैनिक दलाची प्रतिज्ञा घेण्यात आली.
रिपब्लिक दिवसाचे अौचित्य साधून समता सैनिक दल टिम मुंबईच्या वतीने चित्रकला स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा सपन्न झाला. ही चित्रकला स्पर्धा तथागत स्केच बुकच्या साहाय्याने घेण्यात आली. सर्वोत्तम ज्ञानी पुरूष तथागत बुध्द यांचे जीवन आणि शिकवणूक सुलभ आणि सोप्या पध्दतिने मांडण्यासाठी तथागत स्केच बुकची निर्मिती झाली आहे. सदर चित्रकला स्पर्धेचे बक्षिसस्वरूप म्हणून प्रमाणपत्र सर्व ऊत्तीर्ण विद्यार्थ्यांंना देण्यात आले. तसेच प्रथम, द्वितीय, त्रुतिय व चौथे असे विशेष बक्षिस देण्यात आले. ज्यामधे प्रमाणपत्र, रोखरक्कम, बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या संघटनांचे संविधान व आपली नेमकी चळवळ कोणती हे पुस्तक यांचा समावेश होता. सदर स्पर्धेच्या बक्षिस वितरण सोहळ्याला माननीय भिमरावजी आंबेडकर हे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून लाभले. सन्माननीय पाहुण्यांचे स्वागत समता सैनिक दलाच्या वतीने करण्यात आले, त्यांचा पुष्पगुच्छ, बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या संघटनांचे संविधान व आपली नेमकी चळवळ कोणती हे पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला.
रिपब्लिक दिनी पुर्वनियोजित कार्यक्रम साजरा केल्यानंतर SSD टिम मुंबई ने मुंबई महानगरपालिकेचे माजी प्रशासकिय अधिकारी आयु. एम. ए. जाधव सर यांची भेट घेतली. सर्व सैनिकांना जाधव सरांतर्फे त्यांनी प्रकाषित केलेली पुस्तके भेट देण्यात आली व नाटक लिहल्याबद्दल सैनिक अरियं बौध्द यांचे भेटवस्तू देऊन विशेष अभिनंदन करण्यात आले.
चित्रकला स्पर्धेत ऊत्तीर्ण विद्यार्थ्यांची नावे
प्रथम : यश कांबळे
द्वितीय : शशांक इंगळे
त्रुतीय : अंकिता गायकवाड
चौथे : अनिकेत कांबळे
समता सैनिक दल
8655582188
9324127909
www.ssdindia.org
( रिपब्लिकन चळवळीच्या पुनर्बांधणीसाठी कटिबध्द )