:: “समता सैनिक दल ” चा कॅडर कॅम्प नागपूर ::
दि. १२.०४.२०१५ रोजी समता सैनिक दलाची कार्यशाळा संपन्न झाली. ६० च्या जवळपास कार्यकर्ते उपस्थित होते. आता रिपब्लीकन आंदोलनाला गतिमान केल्याशिवाय तरणोपाय नाही यावर एकमत झाले. रिपब्लिकन आंदोलनाला बळकटी देण्यासाठी तळागाळापर्यंत जावून कार्ये करण्यासाठी तयार असल्याची भूमिका प्रत्येकाने मांडली.
समता सैनिक दलावर रिपब्लिकन आंदोलनाला प्रबळ करण्याची फार मोठी जबाबदारी आहे, हेच आमच्या चळवळीला पुढे नेवू शकते, यावर शिक्कामोर्तब झाले आणि कार्यकर्ते कामास लागले.
आयु. दिनेश राउत , आयु. संजय गणवीर, कैलाश धाकडे , जग्गनाथ सोळुंके , श्रीकृष्णा खोब्रागडे यांनी आदल्या दिवशी हस्तपत्रिका वाटून मोलाचे सहकार्य केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंचशील बौद्ध विहार, पंचशील नगर, इसासनी, हिंगणा, नागपूर येथील समाजबांधवांच्या अमूल्य सहकार्याबद्दल समता सैनिक दल आभारी आहे.
या कार्यक्रमामध्ये नव्या उमलत्या पिढीची प्रामुख्याने उपस्थिती होती हे विशेष !
रिपब्लिकन परिवाराच्या तीन वारसाहक्काने आपणास मिळालेल्या फक्त आणि फक्त तीनच संघटना आहेत त्या म्हणजे समता सैनिक दल, रिपब्लिकन पार्टी, भारतीय बौद्ध महासभा होत आणि त्यांची महती विशद करून रिपब्लिकन आंदोलनच्या गतिमानतेकरिता कसा उपयोग करायला हवा हे समाजापुढे मांडले.
प्रमुख मार्गदर्शक आयु. मेघराज काटकर, चंद्रपूर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित रिपब्लिकन पार्टीची तत्वे, कार्यक्रम व घटनेची विस्तृत माहिती समजवून सांगितली. प्रास्ताविक, संचालन व आभारप्रदर्शन आयु. मिलिंद शामकुरे यांनी केले.
पुढील कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळावर संपर्क साधावा.
www.ssdindia.org
समता सैनिक दल.(Headquarter, Deekshabhoomi, Nagpur) www.ssdindia.org
(Very Important Note : Samata Sainik Dal, Republican Party and The Buddhist Society of India togetherly constitute the REPUBLICAN FAMILY. These are all the integral parts/members of this family. Constitutions of SSD, RPI & BSI are available in the volumes of writing & speeches of Dr. B. R.Ambedkar. For quick reference, visit www.ssdindia.org )