समता सैनिक दलाच्या वतीने “प्रबोधन शिबीर” ::
स्थळ :- अनाथपिंडक बौद्ध विहार, नर्मदा कॉलोनी, काटोल रोड, नागपूर.
दिनांक :- २६/०९ /२०१५ ,
जय भिम …
दि. २६ सप्टेंबर २०१५ रोजी “ अनाथपिंडक बौद्ध विहार, नर्मदा कॉलोनी, काटोल रोड, नागपूर “ येथे समता सैनिक दलाच्या वतीने प्रबोधन शिबीराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमा अंतर्गत रिपब्लिकन चळवळीची बांधणी करणे , चळवळीच्या दिशेने वाटचाल करणे, धार्मिक, सामाजिक – सांस्कृतिक कार्यात एकोपा निर्माण करणे , विरोधकाबाबत निर्णायक भूमिका घेणे इत्यादी विविध विषयांसोबत रिपब्लिकन चळवळ मजबूत करण्यासाठी “समता सैनिक दलाची” संविधानिक बांधणी करूनच समाज एकसंघ होऊ शकतो यांवर प्रबोधन करण्यात आले. समाज बांधवांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि समाज एकसंघ निर्मितीची प्रक्रिया म्हणून समता सैनिक दलाची शाखा उभारण्यासाठी एकमत होऊन त्या दृष्टीने संविधानिक रिपब्लिकन पार्टी च्या पुनर्बांधणीस कटिबद्ध राहून प्रयत्न करण्याचे ठरविण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शन आयु. मेघराज काटकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजक समिती अनाथपिंडक बौद्ध विहार तसेच समता सैनिक दलाच्या वतीने आयु. प्रमोद वाळके, सचिन गजभिये, शिरीष धनद्रव्ये , यांनी विशेष परिश्रम घेतले.
अधिक माहितीसाठी www.ssdindia.org या संकेतस्थळावर संपर्क साधावा.
शिकवा, चेतवा आणि संघटीत करा !