:: “समता सैनिक दल ” चा कॅडर कॅम्प नागपूर ::
जय भिम …
दि.26 एप्रिल २०१५ ला त्रिशरण बुद्ध विहार, हुडको कॉलोनी, जरीपटका येथे समता सैनिक दलाचे यशस्वी कॅडर पार पडले. प्रमुख मार्गदर्शक आयु. मेघराज काटकर, चंद्रपूर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित रिपब्लिकन पार्टीची तत्वे, कार्यक्रम व घटनेची विस्तृत माहिती समजवून सांगितली. प्रास्ताविक, संचालन व आभारप्रदर्शन आयु. मिलिंद शामकुरे यांनी केले. ६० च्या वर कार्यकर्ते उपस्थित होते. महिलांचा जास्त सह्भाग होता.
समता सैनिक दलावर रिपब्लिकन आंदोलनाला प्रबळ करण्याची फार मोठी जबाबदारी आहे, हेच आमच्या चळवळीला पुढे नेवू शकते, यावर शिक्कामोर्तब झाले.
यानंतर “रिपब्लीकन चळवळ ” यशस्वी होण्यासाठी 15 लोकांची एक समिती गठीत करन्यात आली..
लवकरच ‘ रेसिडेंशल ‘ तीन दिवसाचे कॅडर घेन्याची जबाबदारी हर्षवर्धन ढोके ,प्राशिक आनंद, प्रमोद वाळके, संजय नगरकर यांच्याकडे सोपविन्यात आली.
कार्याकर्माच्या यशशिवितेसाठी आयुषमती. नंदा देशभरतार, आशा वाळके, उमा नगराळे, रेखा रंगारी, अर्चना गडपायले, सरिता तांबे, रंजना हिरेखन, पोर्णिमा रामटेके यांनी अथक परिश्रम घेतले. त्रिसरण बौद्ध विहार, हुडको कॉलोनी, जरीपटका, नागपूर येथील समाजबांधवांच्या अमूल्य सहकार्याबद्दल समता सैनिक दल आभारी आहे.