Cadre Camp 08 March 2015


दि. ०८.०३.२०१५ रोजी समता सैनिक दलाची कार्यशाळा संपन्न झाली. ५० च्या वर कार्यकर्ते उपस्थित होते. रिपब्लीकन परिवाराची काय भूमिका असावी यावर प्रकाश टाकण्यात आला. समता सैनिक दलाला कशी बळकटी आणता येईल यावर हि विचार करण्यात आला. सोबत ‘जागतिक महिला दिन’ हि साजरा करण्यात आला. बाबासाहेबांचे महिलांविषयी चे विचार मांडण्यात आले.

आयुष्यामती. संगीता वाळके व आयु. चित्तरंजन डेकाटे, चिमूर यांनी आदल्या दिवशी हस्तपत्रिका वाटून मोलाचे सहकार्य केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयु. प्रशिक आनंद, आनंद कौशल, सचिन गजभिये, प्रमोद वाळके यांनी परिश्रम घेतले. संचालन आयु. मिलिंद शामकुरे, चंद्रपूर यांनी केले. आयु. मनोज खोब्रागडे, मुंबई व संजय नगरकर, नागपूर यांची विशेष उपस्थिती होती. कार्यकमामध्ये २५% महिलांची उपस्थिती होती आणि प्रमुख मार्गदर्शन आयु. मेघराज काटकर, चंद्रपूर यांनी केले.

समता सैनिक दलाने भारतीय बौद्ध महासभा व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्याशी हातात हात घालून चळवळीचे राजकीय तसेच धार्मिक कार्य एकत्रितपने करून समाजापुढे आदर्श घालवून देणे हीच काळाची गरज आहे, यावर एकमत झाले. अश्याप्रकारे कार्यक्रम संपन्न झाला. पुढील कार्यशाळा हि ‘इसासनी बौद्ध विहार’, नागपूर येथे दि. १५.०३.२०१५ ला घेण्यात येणार आहे. सर्वांनी यात सहभाग नोंदवावा. अधिक माहितीसाठी www.ssdindia.org या संकेतस्थळावर संपर्क साधावा.IMG-20150309-WA0017 IMG-20150309-WA0019

 

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *