:: समता सैनिक दल कॅडर कॅम्प संबोधि बौद्ध विहार, गिट्टी खदान, काटोल रोड, नागपूर ::
जय भिम …
दि. ०३ मे २०१५ ला संबोधि बौद्ध विहार, गिट्टी खदान, काटोल रोड, नागपूर येथे समता सैनिक दलाचे यशस्वी कॅडर पार पडले. यामध्ये प्रमुख मार्गदर्शन मेघराज काटकर आणि मिलींद शामकुळे यांनी केले. रिपब्लिकन परिवाराच्या (समता सैनिक दल, भारतीय बौध्द महासभा, रिपब्लिकन पार्टी ) घटना यावेळी समजवून सांगण्यात आल्या. रिपब्लिकन चळवळ मजबूत करण्यासाठी सर्वांनी आपली कटिबद्धता जाहीर केली. ६० लोकांचा यात सहभाग होता.
कार्यक्रमाच्या यशश्वीतेसाठी आयुष्यमती. प्रमिलाताई पाटील, वेणूताई मून, जोत्सना मून, संगीता वाळके, तसेच आयु. प्रशिक आनंद, आयु. चित्तरंजन डेकाटे. चिमूर यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमास केलेल्या सर्व मदतीबद्दल संबोधि बौद्ध विहाराच्या सर्व कार्यकारी मंडळाचा समता सैनिक दल आभारी आहे.
अधिक माहितीसाठी www.ssdindia.org या संकेतस्थळावर संपर्क साधावा.
शिकवा, चेतवा आणि संघटीत करा !
समता सैनिक दल.(Headquarter, Deekshabhoomi, Nagpur)
(Very Important Note : Samata Sainik Dal, Republican Party and The
Buddhist Society of India togetherly constitute the REPUBLICAN FAMILY. These are all the integral parts/members of this family.Refer the constitutions of these three organizations in the volumes of writing and speeches of Dr.B.R.Ambedkar. It is available online at above website too.)