💥 चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तहसीलची सशक्त रिपब्लिकन चळवळीकडे वाटचाल 💥
रविवार, दिनांक 17/12/2017, रोजी रात्री 8 वाजता काटवल-तुकुम येथील पंचशील विहार, तह. भद्रावती, जिल्हा चंद्रपूर येथे समता सैनिक दलाच्या वतीने काही दिवसांपूर्वी आंबेडकरी बौद्ध अनुयायांत संघटनात्मक जनजागृती अभियानाचा भाग म्हणून बाबासाहेबांनी समाजाच्या उद्धारासाठी दिलेल्या रिपब्लिकन चळवळीच्या तीन मूलगामी संघटनांवर (RPI, SSD, BSI) मार्गदर्शन करण्यात आले होते. समाजाने आता रिपब्लिकन चळवळ पूर्ववत सशक्त करून समाज संघटित करण्याकडे वाटचाल केली पाहिजे असे त्यात ठरविण्यात आले होते त्या अनुषंगाने समता सैनिक दलाची तिच्या घटनेनुसार अंमलबजावणी करण्याच्या दिशेने गावातील तरुणांनी, स्त्री-पुरुषांनी हिरीरीने सहभाग नोंदविला आणि सदस्यता स्वीकारून रिपब्लिकन चळवळीची लाट निर्माण करण्यासाठी समता सैनिक दलाचे अधिकाधिक सामर्थ्य निर्माण करण्याचा प्रण केला. लवकरच ग्रामपातळीवर शाखेची (कार्यकारिणी) स्थापना करून भविष्यात कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन हे रिपब्लिकन चळवळ सशक्तीकरणासाठीच असणार यांवर शिक्कामोर्तब केले.
हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता समता सैनिक दल, चंद्रपूर येथील पदाधिकाऱ्यांच्या वतीने परिश्रम घेणारे प्रामुख्याने आयु. शार्दूल गणवीर, नागपूरहून आलेले आयु. प्रशिक आनंद तसेच इतरही गणमान्य कार्यकर्ते होते. आयोजनकर्त्यांत विहाराचे अध्यक्ष बंडू भैसारे, निकेश टेम्भुर्ने, धर्मशिव टेम्भुर्ने, अजय सोरदे कार्यक्रमात महिलांनी व तरुणांनी घेतलेल्या लक्षणीय सहभागाबद्दल व कार्यक्रमास यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल उपस्थित सर्व समाज बांधवांचे आभार.
जय भीम
द्वारा : समता सैनिक दल, चंद्रपूर
www.ssdindia.org
(रिपब्लिकन चळवळीच्या घटनात्मक पुनर्बांधणीसाठी कटिबद्ध)