👮 समता सैनिक दल 👮
रविवार दि. 21 फेब्रुवारी 2016 को दीक्षाभूमी, नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्यावर चर्चात्मक अध्ययन करून खालील विषयावर अभ्यासात्मक चिंतन केल्या गेले.
विषय : . शिक्षित व्हा, चळवळ करा, संघटीत व्हा , आत्मविश्वास बाळगा, कधीही धीर सोडू नका ही आमच्या जीवनाची पंचसूत्र. (Vol.19)
दिनांक 20 जुलै1942 च्या अखिल भारतीय दलित वर्ग परिषदेच्या नागपूर येथील अधिवेशनात सर्व दलित वर्गाची एका संघटनेत एकसंघ शक्ती एकवटल्याचे अतुलनीय कार्य केल्याबद्दल तसेच व्हाईसराय च्या कौन्सिलात जबाबदारीच्या पदावर त्यांची नेमणूक झाल्याबद्दल बाबासाहेबांना मानपत्र देवून त्यांचे गौरवपूर्ण अभिनंदन केल्यावर त्यांनी परिषदेपुढे केलेले एक महत्वपूर्ण भाषण आहे ज्यात ते म्हणतात कि ” मला तुमच्याकडून (समाजातील लोकांकडून) आश्वासन हवे आहे आणि ते आश्वासन म्हणजे शक्ती, ऐक्य व आपल्या हक्कांच्या बाजूने उभे राहण्याचा , आपल्या हक्कांकरिता लढण्याचा आणि आपले हक्क मिळवून विजयी होईपर्यंत कधीही माघार न घेण्याचा तुमचा निर्धार ! हि तुमची जबाबदारी पार पाडण्याकरिता तुम्ही वचनबद्ध झाले पाहिजे.” पुढे ते म्हणतात कि ” आपला संग्राम हा स्वातंत्र्याकरिता आहे, मानवी व्यक्तित्वाच्या विकासाकरिता हा संग्राम आहे..जे मानवी व्यक्तित्व हिंदू समाजव्यवस्थेमुळे चिरडून व छिन्नभिन्न करण्यात आले आणि या राजकीय लढ्यात हिंदू जिंकले व आपण हारलो तर आपण कायमचे चिरडले जाऊ व त्यांचे दमन सतत चालू राहील तेव्हा माझा तुम्हाला शेवटी हाच हितोपदेश आहे ; शिक्षित व्हा, चळवळ करा (लढा उभारा ), संघटीत व्हा , आत्मविश्वास बाळगा आणि कधीही धीर सोडू नका !”
सामुहिक चर्चात्मक अध्ययनाची वेळ दर रविवारी सकाळी 9 से 11 स्थळ : दीक्षाभूमी, नागपूर.
अधिक माहितीसाठी संपर्क करा !
www.ssdindia.org
शिकवा , चेतवा आणि संघटीत करा !
समता सैनिक दल,
HQ, दीक्षाभूमी, नागपूर.