दि. २०/१२/१५ मुंबई ( ऊल्हासनगर ) समता सैनिक दलाच्या शाखेच्या वतीने संत गाडगेबाबा यांचा स्मृतीदिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमात समता सैनिकांनी सम्राट अशोक बूध्द विहार, ऊल्हासनगर-५ यांच्या संचलकांना व तेथिल जनतेला डॉ. आंबेडकरांचे रायटिंग अँड स्पीचेस(Writting & Speeches) चे २१(Volumes) खंड दान स्वरूपात देण्यात आले. प्रत्येक रविवारी बूध्द विहारामधे त्या साहीत्याचे सामूहीक अध्ययन घडून यावे अशी ईच्छा यावेळी आयू. ऊत्तम धूळे सम्राट अशोक बूध्द विहाराच्या संचालकांनी व्यक्त केली. सामूहीक अध्ययन हाच समता सैनिकांचा ऊद्देश आहे. त्याच निमित्ताने सम्राट अशोक बूध्द विहारामधे समता सैनिक दला मार्फत मोफत ईंग्लिश स्पिकींग क्लासेस सुरू करण्यात आले.
तसेच समता सैनिक दल शाखा ऊल्हासनगरचे सदस्य व सिद्धार्थ पब्लिक स्कुलचे महाराष्ट्र , मुंबईचे अध्यक्ष आयू. राजकूमार कांबळे यांनी देखिल भीमनगर ऊल्हासनगर-४ विभागात संत गाडगेबाबा यांच्या स्मृतीदिनपर कार्यक्रम आयोजित केला होता. दोनही कार्यक्रमामधे संत गाडगेबाबांची समाजसुधारकाची भूमिका समता सैनिकांनी सखोल पणे मांडली. गाडगेबाबांनी नेहमीच गावोगाव हिंडून रस्ते, गल्लीन गल्ली स्वच्छ केली,स्वच्छता मोहीम शहरात-राज्यात रांबवली तसेच रात्री किर्तनातून लोकांचे मेंदूही स्वच्छ केले.आध्यामिक विकास घडवण्यासाठी लोकांसाठी धर्मशाळा,अनाथलाये,आशम, विद्यालये सुरू केली, अंधश्रध्देला गाडल्याशिवाय आपण प्रगती करू शकणार नाही हे ऐका अशिक्षित व्यक्तीने पक्का जाणल होत. म्हणूनच गाडगेबाबा अंधश्रध्देवर प्रहार करायचे,भारताला प्रगतीपथापासून रोखणारा मनूस्मृती ग्रंथ दहन दिन जवळ आला आहे. डॉ. आंबेडकरांनी या मनूला १९२७ ला गाडले परंतू त्या मनूचे सडके विचार काही भारतिय मेंदूंमधे आणि घरात शिल्लक आहेत. अंधश्रध्देने बरबटलेले विचार भारतियांना प्रगती करू देणार नाहीत. पर्यायाने ते त्यागलेलेच बरे ज्याने प्रत्येक भारतिय प्रगती करेल आणि म्हणूनच आपण २५ डिसे. भारतिय मानवमूक्ती दिवसाचे औचित्य साधून मानवाच्या प्रगतीला घातक असलेले ईश्वर, आत्मा, भाग्य, नशिब , देववादी विचार यांचे दहन करूण २२ प्रतिन्या यांचे तंत्तोत पालन हीच समाजाने दिलेली खरी महापुरूषांना आदरांजली ठरेल.
सदर कार्यक्रमात सिध्दार्थ पब्लिक स्कुल उल्हासनगरचे शाखा प्रमुख आयू. संदिप ऊबाळे, आयू. विनोद पडघणे, आयू. शिवाजी धूळे ई. मान्यवर ऊपस्थित होते.
समता सैनिक दल.मुंबई
निलेश कदम.
08655582188.
मंगेश वानखडे.
09324127909
SSD Joining करायला संपर्क साधावा.
(www.ssdindia.org)