Exam on Panchasheel & 22 Vows, Ulhasnagar, Mumbai


🇮🇳🇮🇳 समता सैनिक दल 🇮🇳🇮🇳

🙏 शिकवा चेतवा संघटीत करा 🙏

काल दि. २२ ऑक्टो. २०१५ विजयादशमी “धम्म चक्र प्रवर्तन” दिनी ऊल्हासनगर येथील निब्बाण टेकडी परिसरातील अशोका बुध्द विहारामधे समता सैनिक दल शाखा मुंबई तर्फे घेण्यात आलेली “पंचशिल व २२ प्रतिज्ञा” आधारीत तोंडी स्पर्धा परिक्षा यशस्वारित्या सपन्न झाली. परिक्षेला मिळालेला प्रतिसाद अल्प होता परंतू यावरून असे दिसून आले की आपल्या मधे “पंचशिल आणि २२ प्रतिज्ञा” यांच्या विषयी ऊदासिनता आहे, तसेच राजकीय पूढार्यांची तर समस्याच आहे. त्यांच अस मत आहे की सर्वांसमोर २२ प्रतिज्ञा कश्या घ्यायच्या ? तर त्यांच्या समस्याच समाधान अस आहे की २२ प्रतिज्ञा घेतील अशे सर्व निर्माण करु असो, तर दूसरीकडे लहान लहान विद्यार्थांनी स्पर्धा परिक्षेमधे खूपच छान कामगिरी बजावली आणि त्याच निमित्ताने आम्हाला आमच बालपण आठवल त्या वयात आम्हाला कुणीच “२२ प्रतिज्ञा” सांगितल्या नव्हत्या. स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांचे अभिनंदन. ऊत्तीर्ण स्पर्धकांचे विशेष कौतूक. ज्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात येणार होते असे आमचे जेष्ठ कार्यकर्ता देवरे बाबा आणि “सिध्दार्थ पब्लीक स्कूल” चे आमचे बंधू संदीप ऊबाळे तसेच स्पर्धा शिस्तबध्द पध्दतीने पार पाडण्यासाठी मदत लाभलेल्या विद्यार्थी संघटना “नसोसवायऐफ” सामाजिक संघटना “आधार प्रतिष्ठान” यांचे विशेष आभार.

स्पर्धेत प्रथम क्र. मिळवलेल्या विद्यार्थीचे नाव मूद्दाम टाकत आहोत।।।

कू. श्रूतिका राजू मगरे ( ई. ३री. )

समता सैनिक दल
शाखा:- मुंबई ( ऊल्हासनगर )
www.ssdindia.org
9324127909
8655582188

( रिपब्लीकन चळवळीच्या पूनर्बांधणी साठी कटीबध्द )22 Oct 15 DCP Day Mumbai 1 22 Oct 15 DCP Day Mumbai 2 22 Oct 15 DCP Day Mumbai 3 22 Oct 15 DCP Day Mumbai 4

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *