26 Jan 2016 Celebration of Republic Day at Hinghanghat


:: समता सैनिक दलाचा सहभाग::

सिद्धार्थ नगर, बौद्ध विहार, हिंगणघाट मध्ये गणतंत्र दिन( Republic Day) उत्साहात साजरा.

जय भिम …
दि. 26 जानेवारी 2016 रोजी  सकाळी 8 वाजता सिद्धार्थ नगर, बौद्ध विहार, हिंगणघाट येथे महिला मंडळाच्या वतीने 67 वा गणतंत्र दिवस (Republic Day) साजरा  करण्यात आला. याप्रसंगी समता सैनिक दल, नागपूर च्या वतीने प्रमुख वक्त्या आयुष्यमती संगीता प्रमोद वाळके यांच्या हस्ते झेंडावंदन करून उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. बाबासाहेबांनी समाजास दिलेल्या संघटना आणि त्यांच्या घटना यांची अमलबजावणी करून, सहकार्याने आणि सहचार्याने या देशाच्या राज्यघटनेची अमलबजावणी करणे कसे शक्य आहे यावर त्यांनी विशेषत्वाने वक्तव्य केले आणि समाजास घटनेच्या माध्यमातून एकसंघ  होण्याचे आवाहन केले.

तसेच  आयु. प्रशिक आनंद यांनीही त्याच अनुषंगाने उपस्थितांपुढे आपले विचार मांडलेत. कार्यक्रमास समता सैनिक दलाचे इतरही कार्यकर्ते, आयुष्यमती मोनिका दहीवेले, स्नेहा उके, सुकेशनी, तसेच आयु. दहीवेले सर, इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता कार्यक्रमाचे आयोजक आयु.विजय झाडे आणि त्यांचे सहकारी मित्रमंडळ तसेच समाजबांधव यांनी घेतलेल्या परिश्रमाबद्दल सहृदय साभार. कार्यक्रमास महिलांची उपस्थिती विशेष उल्लेखनीय होती.

द्वारा प्रसारीत :
समता सैनिक दल, HQ दीक्षाभूमी, नागपूर.
www.ssdindia.org

( Committed to the revival of the great  constitutional Republican Party )⁠⁠⁠

शिकवा, चेतवा आणि संघटीत करा ! ⁠26 jan 2016 Hinghanghat

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *