रविवार,दिनांक-25/02/2018 रोजी नालंदा बुद्ध विहार, मालाड (मुंबई-पश्चिम) येथे समता सैनिक दलामार्फत बौद्धिक प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला समाज कसा असावा? या विषयावर समता सैनिक दलाचे सैनिक आयु. सागर गरूड सर यांनी भिम अनुयायी यांना मार्गदर्शन केले. यामध्ये समता सैनिक दलाच्या सद्य स्थितीचे वर्णन करून ठिकठिकाणी शाखा कशी निर्माण करावी तसेच त्या शाखेचा वर्षभराचा कार्यक्रम कसा असावा हे सांगितले.
बाबासाहेबांच्या विविध खंडांचे जमेल तसे सामुहिक वाचन करून चळवळीचे ज्ञान संपादन करून आपल्या मूळ संघटनेचे काम करावे. तसेच विहारामध्ये वत्कृत्त्व स्पर्धा,निबंध स्पर्धा आदी विविध कलांवर आधारित स्पर्धा आयोजित करावी. त्यामुळे तरुण वर्ग वाचक बनेल.लेखक आणि कलाकार बनण्यास त्यांना उत्तेजना मिळेल.मुलांना प्रशासन व्यवस्थेमध्ये प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी समाजातील,कुटुंबातील सदस्यांनी कसोशीने प्रयत्न केले पहिजेत.
बाबसाहेबांनी शासनकर्ती जमात व्हा! असे वाक्य उद्गगारले होते.आपल्याला 18 वर्षे पूर्ण झाल्यावर जसा संविधानिक मतदानाचा अधिकार प्राप्त होतो,तसेच आपल्या कुटुंबातील 18 वर्षे पूर्ण झालेल्या तरुण तरुणींना एकत्र करून समता सैनिक दलाचे सदस्यत्व स्वीकारले पाहिजे आणि सामाजिक कार्यात हातभार लावला पाहिजे असे आवाहन केले.
त्यानंतर सैनिक अभयादित्य बौद्ध यांनी आपल्या राजकीय चळवळीचे म्हणजेच RPI चे कसे तुकडे झाले ,याला कोण जबाबदार आहे? याचे सविस्तरपणे विश्लेषण केले.लाचार होऊन दुसऱ्यांच्या ताटाखालची मांजरे होऊन जगण्यापेक्षा आपल्या मूळ संघटनेचे काम हाती घेतले पाहिजे असे सांगितले.
मुंबई जिल्ह्याचे सैनिक आयु.अनिकेत कांबळे, आयु.सुचित सावंत, आयु. रोहित तुरेराव , आयु.फकिरा थोरात यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले आणि उपस्थित युवकांना रितसर पावती देऊन दलाचे सभासद बनवून घेतले.
शेवटी दलाची प्रतिज्ञा घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
समता सैनिक दल
( मुख्यालय : दीक्षाभूमी, नागपूर)
www.ssdindia.org