दिनांक 4/7/2017 रोजी पंचशील बौद्ध विहार वार्ड न.4 भीमनगर,चंद्रपूर येथे समता सैनिक दलाच्या वतीने आयू. प्रशिक आनंद सर यांच्या मार्गदर्शनात सदस्य चर्चासत्र बैठकीचा कार्यक्रम सायं. 10 वाजता सम्पन्न झाला सदर बैठकीत आंबेडकरी समाजातील वयाची 18 वर्ष पूर्ण झालेल्या तरुण/तरुणीने समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा,तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ़ इंडिया चे डॉ.आम्बेडकरानी घटनेत सांगीतल्यानुसार सभासद पावती फाडून रितसर सभासद झाले पाहिजे असे ठरविण्यात आले..हा कार्यक्रम पार पाडन्याकरिता आयु-शार्दुल गणवीर,आयु-शैलेन्द्र बेलसरे, आयु-अविनाश बेले, आयु-शैलेशजी सोनटके,आयु-मुकेश हुमने व सैनिक मित्रांनी अथक परिश्रम घेतले.
समता सैनिक दल, चंद्रपूर
www.ssdindia.org


