~~ समता सैनिक दल ~~
दिनांक. 6 डिसेंबर 2015
महामानव भारतरत्न ड़ॉ.बाबासाहेब आम्बेडकर यांच्या 59 व्या महापरीनिर्वाण दिनानिमित्य HQ दीक्षाभूमी येथे सकाळी 8.30 वाजता बाबासाहेबांच्या पुतळ्याला मानवन्दना, सलामी देण्यात आली. त्यानंतर ” The role of Dr. B. R. Ambedkar in modern india -A study” या विषयावर सामुहिक चर्चात्मक अध्ययन घेण्यात आले.
डॉ.बाबासाहेब हे खरे देशभक्त आणि स्वातंत्रसेनानि होते. त्यांना फक्त ब्रिटिश सरकार कडून देश स्वतंत्र करवून घ्यायचा नव्हता तर समाजातील शोषित ,पीड़ित तसेच उच्चवर्नियांकडून होणारी पिळवणूक ,गुलामगिरी तसेच त्यांच्या बांधवावर होत असलेले अन्यान्य ,अत्याचार यापासुन त्यांची सुटका करुन त्यांना समता ,स्वातंत्र बंधुता आणि न्याय या तत्व प्रणाली वर त्यांना खरे स्वातंत्र द्यायचे होते. आधुनिक भारत कसा असावा याची त्यांनी स्वप्न पाहिली आणि प्रत्यक्षात त्यानी ती साकारली.
सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, क्षेत्रातील योगदानाने त्यानी अवघ्या देशाला समृद्ध केले. तसेच जगातील सर्वोत्कृष्ट सविधान भारताला देणा-या स्वातंत्र ,समता, बंधुता या आधारावर समाज आणि देशाला प्रगतीचा मौलिक मार्ग दाखविला. डॉ.बाबासाहेब हे खुप दूरदृष्टिवादी होते त्याचे सुंदर उदाहरण म्हणजे नदया-जोड़ प्रकल्पासाठी त्यांनी सरकार वर भर दिला. भारताच्या संविधानचे शिल्पकार विश्वरत्न डॉ.बाबासाहेब यांनी समता, मानवी हकक, सामाजिक न्याय, बंधुत्व, एकात्मता, स्वातंत्र, वैज्ञानिक जाणीव जागृती,सांप्रदायिक सदभावना असहिष्णुता, जातीय दुर्भावनाचे व अंधश्रद्धा चे निर्मूलन, बुद्धिवाद इ.साठी आयुष्यभर केलेले संघर्ष व् त्याग तसेच याविषयी त्यांनी दिलेले आदर्श व तत्वज्ञानामुळे सम्पूर्ण मानव समाज उपकृत आहे.त्यांच्या विचारांचे प्रतिबिंब आधुनिक भारताच्या संविधानाच्या मुलभुत तत्वांमधे दिसते. डॉ.बाबासाहेब हे आधुनिक रिपब्लिकन भारताचे पुरस्करते होते. आधुनिक रिपब्लिकन भारत जर कुणी घडविला असेल तर तो फ़क्त आणि फक्त डॉ.बाबासाहेब यांच्या मौलिक योगदानामुळे. त्यांच्या अष्टपैलू वक्तिमत्ववाला मनापासुन अभिवादन. डॉ. बाबासाहेब यांचे सर्व क्षेत्रात योगदान आहे .ते खालील प्रमाणे
1) रिपब्लिकन भारताच्या संविधांनाचे शिल्पकार
2) थोर समाजपरिवर्तक
3) आथिर्क धोरणांचे धुरिण
4) शोषित भारतीयांचे कैवारी
5) आंतरराष्ट्रीय सबंधांचे जाणकार, भाष्यकार
6) सांप्रदायिक सद्भभावना व सहिष्णुता प्रेरक
7) अंधश्रद्धेचे विरोधक
8) महिलांच्या समान हक्कासाठी सदैव संघर्षरत
9) प्रखर देशनिष्ठ
10) झुंझार पत्रकार, संपादक व लेखक
11) करुणाप्रेमी व् अहिँसा चे पुरस्करते
12) प्रभावी वक़्ते
13) सच्चे लोकशाहीवादि
14) कामगारांच्या न्याय अधिकारांचे लढवय्ये
15) प्रखर विज्ञाननिष्ठ
16) शिक्षणाचे प्रेरनास्तंभ
17) शेतकर्यांच्या प्रश्नयासाठी जागरूक
18) निःसीम ग्रंथप्रेमि
19) विचार स्वातंर्याचे खंदे पुरस्करते
20) ऊर्जा जलसंसाधनाचे आद्यनियोजक
21) चिकित्सक संशोधक
23) राष्ट्रीय एकात्मतेसाठी द्रष्टा नेता
24) देशाच्या सरक्षणासाठी सजग
25) मानवाधिकारांचे खंदे पुरस्करते
26) अद्वितीय संसदपटू
References.;_
1) Buddhism and communism , Ambedkar’s speech at the closing session of the fourth conference of the world fellowship of Buddhist in the state Gallery Hall in kathamandu (nepal) on Novembar, (1956)
द्वारा प्रसारित :
समता सैनिक दल,
HQ, दीक्षाभूमी, नागपूर.
www.ssdindia.org