जय भीम..
“रिपब्लिकन एकत्रीकरणच्या सभेत आणि स्टेज वर समता सानिक दलाने वाटलेल्या त्या पत्रकात कोणते प्रश्न होते.? ज्याची उत्तरे अनुत्तरीच राहिलीत ?”
दि. ११ तारखेला नागपूर माहेश्वरी हाल येथे अड. सुलेखा कुंभारे यांनी लोकांची फसगत करून “रिपब्लिकरण एकत्रीकरण” च्या नावाने लोकांची गर्दी जमवून सुलेखा कुंभारे यांनी त्यांच्या वयक्तिक गट “बहुजन- रिपब्लिकन एकता मंच”चा नववा वर्धापन दिन साजरा केला. यावेळेस आठवले,कवाडे,गवई,कुभारे उपस्थित होते. सुलेखा कुंभारे यांचे भाषण सुरु असता आठवले उठून चालते झाले.त्यामुळे सुलेखा कुंभारे यांनी माईक सोडून आठवले जर सभेत बसले नाही तर मी बोलणार नाही असे हास्यास्पद वर्तन केले.ईतकेच नाही तर कुंभारे आणि कवाडे यांनी कांग्रेस, भाजपाचे ईतके गट असतानी समता सैनिक दल एक रिपब्लिकन पक्ष का करण्याच्या मागे लागलेत असले वात्रट भाषण केले. त्यामुळे या असल्या बिनबुडाच्या आणि निरर्थक भाषणाला विरोध करून समता सैनिक दलाने भर स्टेज वर चढून हातात दंडे धरून प्रश्नाचे निवेदन देवून या नेत्यांना उत्तरे मागितली. ईतकच नाही तर त्या प्रश्नांचे झेराक्स प्रत काढून संपूर्ण हाल मध्ये वाटून या नेत्यांचा नालाईक पण जनतेच्या निदर्शनास आणून दिला.हे होत असतानी गवई, कवाडे, आणि कुंभारेचा चेहरा पाह्ण्यालाईक होता.
प्रश्नांची प्रत खालील प्रमाणे होती.ज्याची उत्तरे स्टेज वरील कोणत्याच नेत्याने दिली नाहीत.
१) सुलेखा कुंभारे यांना विदेशातील बुद्ध धम्म प्रचार करायचा आहे की बाबसाहेबानी दिलेला बुद्ध धम्म प्रचार करायचा आहे.
२) आताच रिपब्लिकन नेत्यांना एकतेचे डोहाळे का लागलेत ?
३) वेळोवेळी रिपब्लिकन नेते कधी कांग्रेस तर कधी भाजपाशी हात मिळवणी करतात ? हे समाजाच्या हितासाठी की सात:च्या स्वार्थासाठी?
४) बाबासाहेबांच्या भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल याविषयी आपले मत व धोरण काय आहे?
५) बाबासाहेबांची रिपब्लिकन संकल्पना रुजविण्यासाठी आपला सहभाग किती राहिला ?
६) बहुजन संकल्पना कोणाची? यावर आपले मत काय ?
७) आपली एकीकरणाची संकल्पना संशनीय का मानल्या जावू नये?
८) बाबासाहेबांची चळवळ कमकुवत करण्यात आपला वाटा किती टक्के?
९) तुम्ही चार जन म्हणजे संपूर्ण रिपब्लिकन होय काय ? बाकीच्या पन्नास गटांना तुम्ही का आमंत्रित केले नाही?
१०) एकी झाल्यास सर्वाना भाजपच्या , कांग्रेसच्या दावणीला बांधणार काय?
११) तुम्ही नेहमी समाजाची दिशाभूल केली असे का आम्ही समजू नये.
उत्तर द्या तेही सर्वांसमोर….
सदर प्रश्न अहवाल सुलेखा कुंभारे यांच्या नावाने लिहून स्टेजच्या सर्व मान्यवरांसोबत सभेतील सर्व लोकांना वाटण्यात आले.यावर पिसाळून कवाडे आणि कुंभारे यांनी रिपब्लिकन पार्टीच्या गटाचे उलट समर्थन करणारे भाषण केले. गवई यांचे भाषण वर्ग ५ वीच्या मुलासारखे झाले.ते म्हणाले की मी सकाळी ९ वाजेपर्यंत झोपतो. आठवले यांनी तर त्यांच्या भाषणातून कहरच केला. आठवलेच्या भाषणाच्या वेळेस ‘ जागाव की कुठ जावून जीव द्यावा” असे प्रत्येकाला वाटत होते. आठवले यांनी नेहमीप्रमाने ते एक विक्षिप्त कवी आहेत याचे प्रदर्शन कविता म्हणून म्हणून दाखविल्या. त्यातील एक कविता सादर….
“ मी मजबूत आहे गेंडा
म्हणून माझ्या हाती आहे निळा झेंडा” – रामदास आठवले
असे आमचे नेते ? स्वत:च्या पोळ्या शेकणारे आणि गटांना समर्थन करणारे.
या वेळेस समता सानिक दलाने आपले काम अत्यंत चोखपणे पार पाडले. नारे लावत समता सानिक दलाने स्टेज वर चढून नारेबाजी करून या नेत्यांवर बहिष्कार टाकला. आम्हाला ओरीजनल रिपब्लिकन पार्टीचे सदस्य बनवा ? अशी मागणी जनतेने नारे लाऊन केली. यावेळेस समता सैनिक दलाच्या संगीताताई वाळके,प्रमोद वाळके,प्रशिक आनंद,आनंद कौशल, आकाश मेश्राम, तथागत बोरकर, रवी बोरकर, अमित पाटील, आश्विन,जीवन बागडे,मंगेश बागडे,शिरीष धन्द्र्वे,सचिन गजभिये,मयूर मेश्राम,विलास झाडे,सुरेश जिंदे,मिलिंद खंडारे,संजय नगरकर, मेघराज काटकर, मिलिंद शामकुळे, प्रणय खोब्रागडे,प्रफुल राज्यवर्धन,हर्षवर्धन ढोके आदींचा सहभाग अनन्यसाधारण राहिला.
हर्षवर्धन ढोके