Dr. B. R. Ambedkar Jayanti Celebration 14 April 2015


समता सैनिक दल : डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त प्रबोधन.

दि.१४/०४/२०१५ रोजी समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांनी, संविधान चौक, नागपूर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून तेथे आपला विशेष सहभाग नोंदविला.कार्यक्रमाच्या अनुषंगाने विविध stalls वरून आंबेडकरी विचारांचे साहित्यही सर्वत्र जनतेसाठी उपलब्ध होते आणि त्यापैकीच एका stall वरून समता सैनिक दलाने जनतेच्या प्रबोधनासाठी कंबर कसून प्रयत्न केलेत.

त्यात प्रामुख्याने आपली नेमकी चळवळ कोणती ? आणि त्या चळवळीची ठरलेली दिशा कोणती ? कुठल्या संघटनांचा आपण वारसा पुढे न्यायला हवा ? समाजमान्य नेतृत्वातून निर्माण झालेला नेता आणि स्वयंघोषित नेता ओळखण्याच्या काय कसोट्या असल्या पाहिजेत? अशा विविध प्रश्नांवर योग्य ते मार्गदर्शन करून जनतेच्या प्रश्नांची योग्य ती समाधानपूर्वक उत्तरे देण्यात आली आणि आता खुद्द बाबासाहेबांनी जन्मास घातलेल्या आणि मुहूर्तमेढ रोवलेल्या फक्त आणि फक्त तीनच आपल्या संघटना असून त्यांच्या बाबासाहेबांनी लिखित,मान्यताप्राप्त तिन्ही घटनांची प्रामाणिकपणे अंमलबजावणी केल्याशिवाय आपल्यापुढे दुसरा कुठलाच मार्ग असू शकत नाही असे सर्वानुमते मान्य करण्यात आले आणि आपण त्या घटनांची प्रामाणिकपणे अंमलबजावणी न केल्यामुळेच आपली हि दुर्दशा झाली आहे असे सर्वांनी नम्रपणे मान्य केले.

आणि आता यापुढे मात्र आम्ही असे बेशिस्तपणे वागणार नाहीत आणि उगाच चौथ्या संघटनेच्या नादी लागून, समाजाची दिशाभूल करणारे कार्य आपल्या हातून घडू देणार नाही आणि जर का कोणी तसे करतांना आढळले तर त्याचा योग्य तो समाचार घेण्यासही मागेपुढे पाहणार नाही असे प्रांजळपणे कबुल केले. तेव्हा समता सैनिक दल, रिपब्लिकन पार्टी आणि भारतीय बौद्ध महासभा यांनी एकमेकांशी हातात हात घालुन,खांद्यास खांदा मिळवून पूर्ण सहकार्याने आणि साहचर्याने चळवळीची बांधणी करणे हीच खरी काळाची गरज असल्यामुळे चळवळ बांधणीसाठी आंबेडकरी बौद्ध जनतेनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले.

समता सैनिक दल.(Headquarter, Deekshabhoomi, Nagpur) www.ssdindia.org

(Very Important Note : Samata Sainik Dal, Republican Party and The Buddhist Society of India togetherly constitute the REPUBLICAN FAMILY. These are all the integral parts/members of this family. Constitutions of SSD, RPI & BSI are available in the volumes of writing & speeches of Dr. B. R.Ambedkar. For quick reference, visit www.ssdindia.org )

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *