Collective Study at HQ Deekashabhoomi, Nagpur 29 Nov 2015


दि. २९ नोव्हेंबर २०१५.

समता सैनिक दलाच्या वतीने “ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याचे  सामूहिक चर्चात्मक अध्ययन ”
विषय :-
१. राष्ट्र अजून बनायचे आहे (Vol 20 Page 254)   आणि
२. स्वाभिमानाची ज्योत सतत तेवत ठेवा (Vol 20 Page 428)
१. राष्ट्र अजून बनायचे आहे :
दिनांक ५-२-१९४० रोजी पारशी समाजातील बैठकीत बाबासाहेब यांना बोलावले असतांना बाबासाहेब त्यांचे मत देतात कि “पारशी समाज मुंबईत जास्त आहे व तेथील दैनदिन घडामोडीत पारशी लोकांना भाग घेता येईल. तो भाग त्यांनी कोणत्या पक्षातर्फे घ्यावा हा मुद्दा महत्वाचा नाही, पण त्यांनी गुपचूप न बसता चळवळीत भाग घ्यावा हे महत्वाचे आहे .
२. स्वाभिमानाची ज्योत सतत तेवत ठेवा
दिनांक १४ एप्रिल १९५३ ला त्यांच्या वाढदिवसानिम्मत बाबासाहेब आपल्या लोकांना संदेश देतेवेळी बोलतात कि, “सध्या हे काय चालले आहे. सरकार दारूबंदी पायीं करोडो रुपयांची झीज सोसते पण देश्यातील कोट्यावधी लोक आज विषमतेने भाजून निघत आहेत ते काय सरकारला दिसत नाही”. स्वातंत्र्यात सारे काही ठीक होईल म्हणणारी आजची सरकार  असे का करत आहे ?
म्हणून बाबसाहेब इशारा देतात , राज्यकर्त्यांचे डाव हाणून पाडायचे झाल्यास पिडीत वर्गाने आपले सारे मतभेद विसरून सुसंघटित व्हायला पाहिजे.
आपली ताकद पणाला लावून आपल्या शक्तीचा प्रभाव आपण दाखवायला पाहिजे.
बाबासाहेब नेहमी सांगत कि .”हजारो बाजार बुनग्यांचे सैनिक असण्या पेक्षा मला दहाच शिस्तीचे प्रामाणिक सैनिक असले तरी बस्स झाले.”
मुठभर इंग्रजांनी एवढ्या मोठ्या या देशावर राज्य केले ते कशाच्या जोरावर ! “संघटनेच्या आणि शिस्तीच्या.
म्हणून नुसती संघटना आम्हाला नको तर ती सुसंघटना हवी. तिच्यात इर्षा आणि आणि स्वाभिमानाचा अग्नी सारखा
प्रज्वलित राहिला पाहिजे.”
इत्यादी मुद्दे अभ्यासिले.
उर्वरित भाग/ विषय  पुढील रविवारी घेण्याचे सर्वांनी एकमताने ठरविले .
इछुकांनी या वर्गात सहभागी होण्यासाठी  खालील भ्रमणध्वनी  क्रमांकावर संपर्क साधावा.
9970898880 .
सामूहिक अध्ययनाची वेळ :- दर रविवारी सकाळी ९.०० ते ११.००  HQ दीक्षाभूमि , नागपुर .
अधिक माहितीसाठी
www.ssdindia.org या संकेतस्थळावर संपर्क साधावा.
शिकवा, चेतवा आणि संघटीत करा !

जारीकर्ता: समता सैनिक दल,
HQ, दीक्षाभूमी, नागपूर.

(संविधानिक रिपब्लिकन पार्टी च्या पुनर्बांधणीसाठी कटिबद्ध)29 Nov 2015 1 29 Nov 2015 2

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *