समता सैनिक दलाच्या वतीने “ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याचे सामूहिक चर्चात्मक अध्ययन ” ::
विषय :- अस्पृशांचे धर्मांतर आणि त्यांचे राजकीय हक्क (DBAWS Vol.20 Page No. 210)
जय भिम …
दि. २० सप्टेंबर २०१५ ला दीक्षाभूमि , नागपुर येथे समता सैनिक दलाच्या वतीने “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याचे सामूहिक चर्चात्मक अध्ययन ” घेण्यात आले. या अंतर्गत “1) अस्पृशांचे राजकीय हक्क आणि धर्मांतरण (DBAWS Vol.20 Page No. 200 ) या विषांवर सामूहिक रितीने चर्चात्मक अभ्यास करण्यात आला .
खालील मुद्दे विस्तृतपणे अभ्यासिले व निष्कर्षीले :-
अस्पृश्यांनी धर्मांतर केले तर त्यांना १९३५ च्या कायदान्वये जे राजकीय हक्क देण्यात आलेले आहेत त्यांचा त्यांना उपभोग घेण्याचा हक्क राहतो किंवा नाही. हा मोठा वादग्रस्त प्रश्न होता.
धर्मांतराचा राजकीय हक्कांवर काय परिणाम होईल हे थोडक्यात खालीलप्रमाणे आहे :-
१) नुसता हिंदू धर्माचा त्याग केल्याने व दुसरा कोणताही धर्म न स्वीकारल्याने म्हणजे निधर्मी बनल्याने अस्पृशांचे राजकीय हक्क नष्ट होऊ शकत नाहीत. हा नियम सर्व प्रांतांना लागू पडेल.
२) हिंदुधर्माचा त्याग करून अस्पृश लोकांनी इस्लाम अगर ख्रिस्ती धर्म स्वीकारला तर त्यांचे राजकीय हक्क हिरावले जातील . (कारण इस्लाम आणि ख्रिस्ती लोकांकरिता स्वतंत्र मतदार संघ आहे आणि अस्पृशांना त्यांचे राजकीय हक्क सामान्य मतदार संघामाध्ये असल्यामुळे मिळालेले आहेत ) हा नियम सर्व प्रांतांतील लोकांना लागू पडेल.
३) बंगाल प्रांताखेरीज करून इतर कोणत्याही प्रांतातील अस्पृश्य लोकांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला असताना त्यांचे राजकीय हक्क नष्ट होणार नाहीत.
४) पंजाब प्रांताखेरीज करून बाकी सर्व प्रांतातील अस्पृश्य लोकांनी शीख धर्माचा स्वीकार केला असताना त्यांचे राजकीय हक्क नष्ट होणार नाहीत.
५) कोणत्याही प्रांतातील अस्पृश्य लोकांनी जैन , यहुदी, इस्राईली अगर झोरोस्ट्रीयन पारशी धर्म स्वीकारला तर त्यांचे राजकीय हक्क नष्ट होणार नाहीत. हा नियम सर्व प्रांतांना लागू पडतो.
इछुकांनी या वर्गात सहभागी होण्यासाठी खालील भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
9970898880 , 9403591407
सामूहिक अध्ययनाची वेळ :- दर रविवारी सकाळी ९.०० ते ११.०० दीक्षाभूमि , नागपुर .
अधिक माहितीसाठी www.ssdindia.org या संकेतस्थळावर संपर्क साधावा.
शिकवा, चेतवा आणि संघटीत करा !
( संविधानिक रिपब्लिकन पार्टी च्या पुनर्बांधणी साठी कटिबद्ध )
समता सैनिक दल.
(Headquarter, Deekshabhoomi, Nagpur)