समता सैनिक दलाच्या वतीने “ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याचे सामूहिक चर्चात्मक अध्ययन ” ::
विषय :- रिपब्लिकन पार्टी ऑफ़ इंडिया (DBAWS Vol. 20 Page No. 437)
जय भिम …
दि. 04 ऑक्टोम्बर 2015, रविवार रोजी, दीक्षाभूमि , नागपुर येथे समता सैनिक दलाच्या वतीने “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याचे सामूहिक चर्चात्मक अध्ययन ” घेण्यात आले. या अंतर्गत “ Republican Party of India ” यावर परिचयात्मक अभ्यासातून सामुहिक चर्चा घडवून, तसेच रिपब्लिकन पार्टी साठी बाबासाहेबांनी लिहिलेली मानवमुक्तीचीे जगातील सर्वश्रेष्ठ सात तत्वे….
–रिपब्लिकन पार्टी ऑफ़ इंडिया–
— तत्वे —
1) समान न्याय
2) स्वविकास
3) स्वातंत्र्य
4) समानसंधी
5) दास्य मुक्ती, भूख मुक्ती, भय मुक्ती
6) शोषण मुक्ती( पिळवणूक व दडपशाही पासून)
7) संसदीय लोकशाही
जनमाणसात कशी पोहचविता येईल आणि संविधानिक रिपब्लिकन पार्टी ची बांधणी करण्याची अत्यावश्यकता आणि त्या दृष्टीने भरकस सामूहिक प्रयत्न करण्याचे ठरविले .
इछुकांनी या वर्गात सहभागी होण्यासाठी खालील भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
9970898880 , 9403591407
सामूहिक अध्ययनाची वेळ :- दर रविवारी सकाळी ९.०० ते ११.०० दीक्षाभूमि , नागपुर .
अधिक माहितीसाठी www.ssdindia.org या संकेतस्थळावर संपर्क साधावा.
शिकवा, चेतवा आणि संघटीत करा !
समता सैनिक दल.
HQ, दीक्षाभूमी, नागपूर.
( संविधानिक रिपब्लिकन पार्टी च्या पुनर्बांधणीसाठी कटिबद्ध )